Gautam Gambhir : गंभीरच्या एका इशाऱ्याने दोन दिग्ग्जांचा पत्ता कट, टीम इंडियात मिळणार होती मोठी जबाबदारी
Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू मॉर्ने मॉर्केल टीम इंडियाचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षत असतील. 2027 वनडे वर्ल्ड कपपर्यंत ते टीमसोबत असतील. भारताच्या दोन दिग्गजांवर मात करुन मॉर्केल यांनी टीम इंडियाच गोलंदाजी प्रशिक्षकपद मिळवलं आहे. त्यात गौतम गंभीरचा रोल खूप महत्त्वाचा होता. ज्यांच्यावर मात केली, ते टीम इंडियाचे दोन दिग्गज कोण?
टीम इंडियाचे नवनियुक्त हेड कोच गौतम गंभीर यांच्या कार्यकाळाची सुरुवात श्रीलंका दौऱ्यापासून झाली आहे. टीम इंडियाला आता नवीन बॉलिंग कोच सुद्धा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू मोर्ने मॉर्केल टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक असेल. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पुष्टी केली आहे. भारताच्या दोन दिग्गज खेळाडूंवर मात करुन मॉर्केल टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनला आहे. मोर्ने मॉर्केल पारस म्हाम्ब्रे यांची जागा घेणार आहे. टीम इंडिया पुढच्या महिन्यात बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीज खेळणारा आहे. त्या सीरीजपासून मोर्ने मॉर्केल टीम इंडियासोबत दिसू शकतात. त्यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप 2027 पर्यंत असेल. पुढच्या महिन्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ते रिपोर्ट करतील. ते दुलीप ट्रॉफीचे सामने पाहतील अशी अपेक्षा आहे.
मोर्ने मॉर्केल NCA मध्ये गेल्यानंतर वीवीएस लक्ष्मण आणि एनसीएचे गोलंदाजी प्रमुख ट्रॉय कुली यांची भेट घेतील. रिपोर्ट्सनुसार, बॉलिंग कोचच्या शर्यतीत वेगवान गोलंदाज लक्ष्मीपति बालाजी आणि विनय कुमार मोर्ने मॉर्केलच्या पुढे होते. पण गौतम गंभीर यांच्या शिफारशीमुळे मॉर्केलची निवड झाली.
म्हणून दोघांचा विचार झाला नाही
बीसीसीआयमधील एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, “क्रिकेट सल्लागार समितीला मुख्य कोचची निवड करण्यासाठी मुलाखती घ्यायच्या होत्या. सहाय्यक स्टाफच्या निवडीचा विषय आल्यानंतर गंभीरच्या पसंतीला प्राथमिकता देणं गरजेच होतं. त्यांनी मॉर्केलसोबत काम केलय. गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून गंभीर त्याला मानतो. म्हाब्रे यांनी जी चांगली काम केलीयत, ते मॉर्केल पुढे घेऊन जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर बालाजी आणि विनय कुमारच्या नावाचा विचार झाला नाही”
पाकिस्तान टीमचा कोच
गंभीर आणि मॉर्केलने आयपीएलमध्ये एकत्र काम केलं आहे. हे दोन दिग्गज आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या टीममध्ये एकत्र होते. मागच्या सीजनमध्ये गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्स टीमचा कोच बनला. त्यावेळी सुद्धा मॉर्केल केकेआरचा भाग होता. 39 वर्षाच्या मॉर्केलने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मागच्यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप झाला. त्यावेळी मॉर्केल पाकिस्तान टीमचा कोच होता.
टेस्ट, वनडे आणि T20 करियरमध्ये प्रदर्शनाचा ग्राफ काय?
पाकिस्तानच्या टीमने वनडे वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक प्रदर्शन केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी करार समाप्त होण्याच्या काही महिने आधी मॉर्केलने पद सोडलं. त्याने आपल्या करियरमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून 86 कसोटी सामने, 117 वनडे आणि 44 T20 सामने खेळले आहेत. या दरम्यान मॉर्केलने 309 विकेट, वनडेमध्ये 188 विकेट आणि T20 मध्ये 47 विकेट घेतलेत. मॉर्केल आयपीएलमध्ये सुद्धा खेळलाय.