World Social Media Day निमित्ताने भुवनेश्वर कुमारने जागवल्या आठवणी, जीवनातील अविस्मरणीय फोटोंबद्दल काय म्हणाला भूवी?, पाहा व्हिडीओ

वर्ल्ड सोशल मीडिया डेच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात भारताचा दिग्गज गोलदांच भुवनेश्वर कुमार त्याच्या सोशल मीडियावरी काही फोटोंमागच्या आठवणी सांगत आहे. यात त्याने धोनीबरोबरच्या एका फोटोमागील गोष्टही सांगितली आहे.

World Social Media Day निमित्ताने भुवनेश्वर कुमारने जागवल्या आठवणी, जीवनातील अविस्मरणीय फोटोंबद्दल काय म्हणाला भूवी?, पाहा व्हिडीओ
Bhuvi on World Social Media Day
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 6:02 PM

मुंबई : आजकालच्या ‘ऑनलाईन’ जीवनात सोशल मीडियाचं महत्त्व इतकं वाढलं आहे की जगभरातील प्रत्येक गोष्टीची माहिती सोशल मीडियावर असते. मोठमोठ्या सेलेब्रेटींपासून ते सामान्य व्यक्ती सगळेच आजकाल कमी जास्त प्रमाणात सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यात आज ‘World Social Media Day’ असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी (India Tour Of Sri Lanka) भारतीय संघाचा उप कर्णधार असणाऱ्या भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) आपल्या सोशल मीडियावरील काही अविस्मरणीय फोटोंबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत. (On World Social Media Day Indian Cricketer Bhuvneshwar Kumar Shares His Best Photos Memories Via Video Posted By BCCI)

व्हिडीओमध्ये सर्वांत आधी भुवनेश्वर कुमार त्याचा बालपणीच्या एका फोटोबद्दल सांगतो. ज्यात शाळेतील गणवेशात असणारा छोटा भूवी हातात बॅट घेऊन पोज देताना दिसतो आहे. या फोटो असणारी बॅट ही भूवी आणि त्याच्या मित्रांनी भागिदारीने पैसे काढून घेतली होती. जी दर दोन दिवसांसाठी एका कोणाकडे ठेवण्यात येत होती. जेव्हा भूवीकडे ही बॅट आली तेव्हा उत्सुक भुवीने शाळेचे कपडे न बदलता तसाच फोटो काढल्याचे सांगितले. त्यानंतर महेद्रसिंग धोनीच्या (M S Dhoni) निवृत्तीच्या वेळी पोस्ट केलेल्या फोटोबद्दल बोलताना भूवी म्हणाला, धोनी एक कर्णधारासह व्यक्ती म्हणून किती भारी होता हे सांगत धोनी सोबतच्या आठवणी जागवल्या. त्यानंतर भूवीने त्याचा कुत्रा अॅलेक्साबद्दलच्या काही आठवणी देखील शेअर केल्या. नंतर लग्नावेळीचा आणि कॉलेजच्या दिवसांतील फोटोंचा भूवीने व्हिडीओत आवर्जून उल्लेख केला.

श्रीलंका दौऱ्यासाठी भुवी उपकर्णधार

सध्या भारताचे युवा खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर आहेत. टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल. विशेष म्हणजे या दौऱ्यात बहुतांश नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तर कर्णधार म्हणून शिखर धवन आणि उपकर्णधार म्हणून भुवनेश्वर कुमारच्या खांद्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

हे ही वाचा –

World Social Media Day : ‘या’ क्रिकेटपटूंची सोशल मीडियावर सर्वात जास्त हवा, एका फोटोवर मिळवतात लाखो Likes

बायो बबलचे नियम तोडून रस्त्यावर सिगरेट ओढणाऱ्या खेळाडूंवर 1 वर्षाची बंदी, श्रीलंकेच्या दिग्गज क्रिकेटपटूंची नाव सामिल

ICC Cricket T20 World Cup 2021 Schedule : टी 20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर, फायनल कधी?

(On World Social Media Day Indian Cricketer Bhuvneshwar Kumar Shares His Best Photos Memories Via Video Posted By BCCI)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.