AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs AUS 2nd Odi : पाकिस्तानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, ऑस्ट्रेलिया निर्णायक सामन्यात किती धावा करणार?

Pakistan vs Australia 2nd Odi Toss and Playing 11: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमसाठी यजमान पाकिस्तान विरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना अतिशय महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा आहे. जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ईलेव्हन.

PAK vs AUS 2nd Odi : पाकिस्तानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, ऑस्ट्रेलिया निर्णायक सामन्यात किती धावा करणार?
PAK vs AUS 2nd Odi TossImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 02, 2026 | 5:22 PM
Share

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. यजमान पाकिस्तानने या मालिकेत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने यासह 1-0 अशी आघाडी मिळवून मालिका विजयाचा दावा ठोकला आहे. तर उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे आज 2 जून रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 4 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन आणि वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून एकमेव बदल, पाकिस्तान अनचेंज

पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पाकिस्तानने पहिल्या सामन्यातील विजयी प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूसला ऑस्ट्रेलियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. बिली स्टॅनलेक याच्या जागी एडम झॅम्पा याचा समावेश करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियासाठी करो या मरो सामना

दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम या 3 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे पाकिस्तानसमोर दुसऱ्या सामन्यात विजयी होण्यासह पाकिस्तानला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेतील आपलं आव्हान कायम राखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पहिल्या सामन्यात काय झालं?

पाकिस्तानने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध सहज विजय मिळवला. पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला संपूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नव्हतं. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला 44.1 ओव्हरमध्ये 200 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर पाकिस्तानने 201 धावांचं आव्हान हे 45 बॉलआधी 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. पाकिस्तानने  42.3 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 202 धावा केल्या आणि विजय मिळवला.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : ॲलेक्स कॅरी, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), मार्नस लॅबुशेन, कॅमेरुन ग्रीन, मॅट रेनशॉ, ऑलिव्हर पीक, नॅथन एलिस, तन्वीर संघा, मॅथ्यू कुहनेमन आणि एडम झाम्पा.

पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन: साहिबजादा फरहान, माझ सदाकत, बाबर आझम, गाझी घोरी (विकेटकीपर), अराफत मिन्हास, सलमान आघा, अब्दुल समद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), हरिस रौफ आणि अबरार अहमद.

Follow Us
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना
भर चौकात,रस्त्यावर नमाज पठणास बंदी घाला, भाजप नेत्याने थेट आयुक्तांना.
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद..
गांजाच्या झाडाने तुळशीला पवित्रता शिकवू नये! महायुतीमधील अंतर्गत वाद...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा...
जेजुरी देवस्थानाबाबत मोठा निर्णय, पोलिसांकडून थेट कारवाईचा इशारा....
माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा
माथेरानच्या घोड्यांसाठी देवदूत ठरले अंबानी; मोफत उपचारांनी दिला दिलासा.
लातूर ते सोलापूर, वादळी वाऱ्यानं सगळं संपवलं, शेतकरी मोठ्या संकटात!
लातूर ते सोलापूर, वादळी वाऱ्यानं सगळं संपवलं, शेतकरी मोठ्या संकटात!.
गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्ट
गौतमीचा नादच खुळा! ठसकेबाज डान्स पाहून पब्लिकही लागली नाचायला, एका स्ट.
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा...
अखेर शेतकरी कर्जमाफी झाली! मंत्रिमंडळ बैठकीत थेट थेट मान्यता; वाचा....
मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर
मोठी बातमी! मुंबईत पालिकेची धडक कारवाई! 50 वर्ष जुन्या अवैध दर्ग्यावर.
पत्रकार पोलिसांचे काम करायला लागलेत; गुन्हेगारी दिसत नाही का?
पत्रकार पोलिसांचे काम करायला लागलेत; गुन्हेगारी दिसत नाही का?.
महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट... बंडखोरी शमवण्यासाठीच्या
महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट... बंडखोरी शमवण्यासाठीच्या.