AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत आहे का? त्या मागचं कारण असं असू शकते! जाणून घ्या

काही क्वचित लोकं सोडले तर स्मार्टफोन सर्वांच्या खिशात असतो. त्यामुळे स्मार्टफोन आणि त्याच्याशी निगडीत समस्या आता परिचयाच्या झाल्या आहेत. त्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे स्मार्टफोन गरम होणे.. असं का होत असेल? त्या मागचं एक कारण असू शकते.

तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत आहे का? त्या मागचं कारण असं असू शकते! जाणून घ्या
तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत आहे का? त्या मागचं कारण असं असू शकते! जाणून घ्याImage Credit source: PTI
| Updated on: Jun 02, 2026 | 5:25 PM
Share

स्मार्टफोन वापरताना बऱ्याच समस्या वापरकर्त्यांना जाणवत असताना. इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हंटलं तर काही ना काही तांत्रिक बिघाड होणार हे निश्चित असतं. त्यामुळे जितकी जपून वापरणार तितकं त्याचं आयुष्य वाढणार.. जपून वापरताना त्यातली सर्वाधिक जाणवणारी समस्या म्हणजे स्मार्टफोन गरम होणे. स्मार्टफोन गरम झाला तर त्याला आपण काहीही करू शकते. अनेकांना स्मार्टफोन तापून फुटण्याची भीती देखील वाटते. त्यामुळे पहिल्यांदा फोन स्विचऑफ करण्याकडे कल असतो. कारण एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकते. खासकरून उन्हाळ्यात अशी समस्या अधिक जाणवते. त्यामुळे स्मार्टफोन गरम होण्याची कारणं आपण जाणून घेऊयात…

सध्या प्रचंड तापमान वाढलं आहे. त्यामुळे आपल्याच बाहेर पडणं असह्य होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवरही या वाढत्या उष्णतेचा परिणाम होत आहे. त्यामुळे बाहेर पडल्यानंतर फोन वापरताना काळजी घ्या. फोन उन्हात काढू नका, तसेच गाडीच्या डॅशबोर्डवर ठेवू नका. कारण हा भाग सर्वाधिक तापलेला असतो आणि त्या ठिकाणी स्मार्टफोन ठेवला तर गरम होणार हे नक्की आहे.

स्मार्टफोन गरम होण्याचं मुख्य कारण काय असेल तर त्याचा वापर… गेमिंग, व्हिडीओ पाहणं यामुळे फोनच्या अंतर्गत तंत्रावर ताण वाढत जातो. त्यामुळे स्मार्टफोन गरम होऊ शकतो. गेमिंग, फोटोग्राफी किंवा स्ट्रीमिंगवेळी स्मार्टफोनचा वापर करताना काळजी घेणं आवश्यक आहे. उन्हाळ्यात खासकरून थोडा आराम देणं गरजेचं आहे.

तुमच्या स्मार्टफोनचा ब्राइटनेस अधिक असल्यासही गरम होतो. कारण त्यामुळे बॅटरीवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे ब्राइटनेस कमी ठेवा. तसेच वातानुकील जागेत फोन वापरण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर अनावश्यक एप्स बंद करा. त्यामुळे तुमच्या प्रोसेसरवरील अतिरिक्त ताण कमी होईल.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही चार्जरने कोणताही फोन चार्ज करणे.. आता सर्वच टाईप सी पिन असलेले स्मार्टफोन आहेत. पण दुसऱ्या कंपनीचा चार्जर व्होल्टेज नियंत्रित करतीलचं असं नाही. त्यामुळे बॅटरी गरम होऊ शकते आणि नुकसान होईल. त्यामुळे तुमचा फोन कंपनीने दिलेल्या चार्जरने चार्ज करा.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!