महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट… बंडखोरी शमवण्यासाठीच्या हालचालींना वेग, राजकारणात मोठं घडणार?
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मित्र पक्षांमध्येच मतभेद आढळून येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अशात विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे.
राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मित्र पक्षांमध्येच मतभेद आढळून येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अशात विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. अमरावती, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे. अशात अंतर्गत भेद संपवण्यासाठी महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींना वेग आला आहे.
आता यासंदर्भात महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. बंड करणाऱ्यांनी अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याआधी बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जाईल. यादरम्यान सुनील तटकरे यांची रवींद्र चव्हाणांसोबत अर्धा तास बैठक झाली. एकूणच बंड करणाऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तसेच युतीतील अंतर्गत वाद शमवण्यासाठी प्रमुख नेते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Published on: Jun 02, 2026 01:59 PM
24 तास दरवाजे...सरनाईकांच्या विधानाची एकच चर्चा!
याला म्हणतात धाक! सर्वत्र चर्चेत असलेले तुकाराम मुंढे छापा टाकणार या..
वंचितला पाठिंबा द्यायचा की नाही? काँग्रेसच्या भूमिकेविषयी मोठी माहिती
भीमशंकर देवस्थानाबाबत मोठा निर्णय! आता VIP दर्शन बंद; नवा नियम नेमका

