PAK vs BAN : गतविजेता ते शून्यविजेता, 2 शेजाऱ्यांचा सामना पावसामुळे रद्द, बांगलादेश-पाकिस्तानला प्रत्येकी 1-1 पॉइंट
Pakistan vs Bangladesh Match Abandoned Due To Rain : गतविजेता आणि यजमान पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं या स्पर्धेत विजयाने शेवट करण्याचं स्वप्न भंगलं आहे.

पावसाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत एकूण दुसरा सामना जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर स्पर्धेतील नववा सामनाही पावसाने यशस्वीरित्या जिंकला आहे. या नवव्या सामन्यात ए ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. या सामन्याला नियोजित वेळेनुसार दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित होतं. तर 2 वाजता टॉस होणार होता. मात्र पावसामुळे टॉसच होऊ शकला नाही. क्रिकेट चाहत्यांनी जवळपास सव्वा 2 तास वाट पाहिली. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे अखेर सामना टॉसशिवाय रद्द करण्यात आल्या. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.
दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण
पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांना साखळी फेरीतील पहिल्या 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलं. दोन्ही संघांचं यासह स्पर्धेतून आव्हान संपुष्ठात आलं. त्यामुळे दोन्ही संघांचा तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मोहिमेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता. मात्र पावसाने तसं होऊ दिलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुणावर समाधान मानावं लागलं आहे. यासह ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये बांगलादेशला तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलंय. तर पाकिस्तान सर्वात शेवटी अर्थात चौथ्या स्थानी राहिलीय.
दरम्यान याआधी 25 फेब्रुवारीला बी ग्रुपमधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातही टॉस होऊ शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला.
पावसाची बॅटिंग, सामना रद्द
Rain plays spoilsport as #PAKvBAN is called-off in Rawalpindi ⛈️
More ➡️ https://t.co/sH1r63WCCD pic.twitter.com/hFe6ETayTG
— ICC (@ICC) February 27, 2025
पाकिस्तान टीम : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद, कामरान गुलाम, मोहम्मद हसनैन, उस्मान खान आणि फहीम अशरफ.
बांगलादेश संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तन्झिद हसन, मेहिदी हसन मिराझ, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा, तन्झिम हसन साकिब, परवेझ होसैन, सोमोनम अहमद आणि इमोनम सरोद.
