PAK vs BAN : दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचं बांगलादेशसमोर फक्त 184 धावांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्याची कसोटी मालिकी सुरु आहे. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात पाकिस्तानने सर्वबाद 172 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता बांगलादेश संघ हे आव्हान गाठून इतिहास रचणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात पाकिस्तानचा डाव 184 धावांवर आटोपला. पाकिस्तानने बांगलादेशसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं आहे. तसं पाहिलं तर हे आव्हान सोपं आहे. त्या बांगलादेशनचे पहिला कसोटी सामना जिंकून ते सिद्धही करून दाखवलं आहे. त्यामुळे बांगलादेशनचे दुसरा कसोटी सामना जिंकला तर पाकिस्तानला व्हाईट वॉश देईल. बांगलादेशच्या कसोटी इतिहासात पहिल्यांच व्हाईट वॉश देण्याची ही वेळ आहे. तेही पाकिस्तानच्या भूमीवर व्हाईट वॉश दिल्याने इतिहासात नोंद होईल. खरं तर बांगलादेश हा संघ कसोटी दुबळा मानला जातो. पण पाकिस्तानवर मिळवलेली पकड पाहता तसंच म्हणता येईल. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे चार दिवसात जे काय व्हायचं ते होणार आहे. पहिल्याच दिवशी बांगलादेशने पाकिस्तानला दाखवून दिलं.
पाकिस्तानचा पहिला डाव सर्वबाद 274 धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ अडखळेल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. बांगलादेशने तोडीस तोड उत्तर दिलं. बांगलादेशने सर्वबाद 262 धावा केल्या आणि पाकिस्तानकडे 12 धावांची आघाडी गेली. दुसऱ्या डावात पाकिस्तान मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. पण झालं भलतंच. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 172 धावांवर तंबूत परतला. बांगलादेशसमोर विजयासाठी 184 धावांचं आव्हान आहे. आता बांगलादेश हे आव्हान गाठणार की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, सइम अयुब, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सउद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मोहम्मद अली, मीर हमजा.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद, नाहिद राणा
