AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs ENG : पहिल्या दिवशी पाकिसानचा संघ इंग्लंडवर भारी, शान मसूद-शफीकची शतकी खेळी

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरु असून पहिल्या दिवसावर पाकिस्तानने पकड मिळवली आहे. अब्दुल्ला शफीक आणि शान मसूदच्या शतकी खेळीमुळे 300 पार धावसंख्या करण्यास मदत झाली आहे.

PAK vs ENG  : पहिल्या दिवशी पाकिसानचा संघ इंग्लंडवर भारी, शान मसूद-शफीकची शतकी खेळी
Image Credit source: Twitter
| Updated on: Oct 07, 2024 | 6:11 PM
Share

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करणं पसंत केलं. पण चौथ्या षटकात सईम अयुब स्वस्तात बाद झाला आणि संघावरील टेन्शन वाढलं. पण अब्दुल्ला शफीक आणि शान मसूद यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 253 धावांची भागीदारी केली. अब्दुल्ला शफीक 184 चेंडूत 102 धावा करून बाद झाला. गस एटकिंनसनच्या गोलंदाजीवर ओली पोपने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लगेचच कर्णधार शान मसूदची विकेट पडली. शान मसूदने 177 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 151 धावा केल्या. पण जॅक लीचच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि बाद होत तंबूत परतला. त्यानंतर सर्वांचा नजरा या बाबर आझमकडे खिळल्या होत्या. कारण कर्णधारपदातून मोकळा झाल्यानंतर फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं होतं. पण या सामन्यातही काही खास करू शकला नाही.

बाबर आझमने 71 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि पायावर चेंडू आदळला. बाबर आझमने तात्काळ रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. पण रिव्ह्यूतही बाबर आझम बाद असल्याचं निष्पन्न झालं आणि एक रिव्ह्यू वाया जाण्याची वेळ आहे. पाकिस्तानने पहिल्या दिवसअखेर 4 गडी गमवून 328 धावा केल्या आहेत. तर सउद शकील नाबाद 35 आणि नसीम शाह नाबाद 0 धावांवर खेळत आहे. आता दुसऱ्या पाकिस्तानचा संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. नुकतंच बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला क्लिन स्वीप दिला होता. त्यामुळे पाकिस्तानची गाडी कधी रुळावरून घसरेल सांगता येत नाही.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सइम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.