PAK vs IRE Live Streaming: पाकिस्तानसमोर आयर्लंडचं आव्हान, शेवटचा सामना कोण जिंकणार?
Pakistan vs Ireland T20 World Cup 2024 Live Match Score: पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांना स्पर्धेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 36 व्या सामन्यात ए ग्रुपमधील शेवटचा सामना हा पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यात खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांचा हा अखेरचा सामना आहे. दोन्ही संघांचं आव्हान याआधीच संपुष्टात आलं आहे. पाकिस्तान आणि आयर्लंडला या स्पर्धेत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाकिस्तानला यूएसए आणि टीम इंडियाकडून पराभूत व्हावं लागलं. तर कॅनडा विरुद्ध एकमेव विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या बाजूला उलटफेर करण्यात महारथ असलेल्या आयर्लंडला विजयाचं खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे शेवटच्या सामन्यात पाकिस्तानवर मात करत स्पर्धेतील शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न आयर्लंडचा असणार आहे.
पाकिस्तान-आयर्लंड सामना केव्हा?
पाकिस्तान-आयर्लंड सामना रविवारी 16 जून रोजी होणार आहे.
पाकिस्तान-आयर्लंड सामना कुठे?
पाकिस्तान-आयर्लंड सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान-आयर्लंड सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
पाकिस्तान-आयर्लंड सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
पाकिस्तान-आयर्लंड सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?
पाकिस्तान-आयर्लंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
पाकिस्तान-आयर्लंड सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
पाकिस्तान-आयर्लंड सामना मोबाईलवर फुकटात डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आयर्लंड टीम : पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबिर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोशुआ लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफ्रीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.
