
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याला गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. आऊट ऑफ फॉर्म असल्याने बाबरला टी 20I संघात फार संधी दिली जात नाही. बाबरची कामगिरी काही वर्षांआधी इतकी भारी होती की त्याची तुलना थेट टीम इंडियाचा दिग्गज विराट कोहली याच्यासोबत केली जायची. मात्र आता बाबरच्या बॅटमधून धावाच निघेना. बाबरला 1-1 धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. बाबरचा हाच फ्लॉप शो श्रीलंकेविरुद्धच्या वने सीरिजमध्येही पाहायला मिळाला.
बाबरला श्रीलंकेविरुद्ध अपेक्षित सुरुवात मिळाली. बाबरने दुहरी आकडाही गाठला. मात्र बाबरने ज्या वेगाने धावा केल्या ते पाहून कासवही लाजेल. बाबरने वनडे क्रिकेटमध्ये टेस्ट प्रमाणे बॅटिंग केली. बाबरने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या वनडेत रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये 56.86 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. बाबरने 29 धावा केल्या. बाबरने या 29 धावांसाठी तब्बल 51 चेंडूंचा सामना केला. बाबरच्या या सुमार कामगिरीमुळे त्याच्यावर नेहमीप्रमाणे टीका केली जात आहे.
बाबरला या सामन्यात धावांसाठी संघर्ष तर करावाच लागला. इतकंच नाही तर बाबरने त्याच्या या खेळीतील पहिली धाव ही 12 चेंडूंनंतर केली.बाबरने 13 व्या बॉलवर खातं उघडलं. मात्र असं असलं तरी प्रत्येक खेळाडूला वाईट स्थितीतून जावं लागलं. सध्या बाबरची धावांबाबत वाईट वेळ सुरु आहे. बाबर यावर मात करुन कमबॅक करेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.
बाबरने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे 30 ऑगस्ट 2023 रोजी लगावलं होतं. बाबरने वनडे आशिया कप 2023 स्पर्धेत नेपाळ क्रिकेट टीम विरुद्ध शतक झळकावलं होतं. तेव्हापासून बाबरची आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतिक्षा कायम आहे. यावरुन बाबरचा कशाप्रकारे संघर्ष सुरु आहे? याचा अंदाज बांधता येतो.
बाबरने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक करुन आता 804 दिवस झाले आहेत. बाबरला तेव्हापासून 83 डावांमध्ये शतक करता आलेलं नाही. बाबरने गेल्या 6 वनडे सामन्यांमध्ये 83 धावा केल्या आहेत.
बाबरचा फ्लॉप शो
🚨 Babar Azam last 33 ODI innings 🚨
151(131), 66(63), 64(90), 17(22), 38(45), 23(26), 10(24), 37(44), 78(83), 29(35), 15(20), 1(3), 5(18), 28(30), 50(58), 10(15), 23(38), 47(64), 50(58), 73(95), 0(3), 18(14), 52(71), 9(23), 74(92), 10(23), 7(12), 50(65), 23(19), 11(13), 9(16),… pic.twitter.com/MjoHkQG0Iv
— ICC Asia Cricket (@ICCAsiaCricket) November 11, 2025
तसेच बाबर आझम याने 2025 या वर्षात आतापर्यंत एकूण 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत. बाबरने या सामन्यांमध्ये 27.20 च्या सरासरीने 408 धावा केल्या आहेत. बाबरने या दरम्यान फक्त 3 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे आता बाबरला सुमार कामगिरीनंतर श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात संधी मिळणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.