एकदम झकास! पाकिस्तानच्या मोहम्मद हसनैनचा गोळी यॉर्कर पहा, फलंदाज काही करुच शकला नाही, VIDEO

पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनवर (mohammad hasnain) अलीकडेच गोलंदाजीच्या संशयास्पद अॅक्शनमुळे बंदी घालण्यात आली होती.

एकदम झकास! पाकिस्तानच्या मोहम्मद हसनैनचा गोळी यॉर्कर पहा, फलंदाज काही करुच शकला नाही, VIDEO
mohammad hasnain
Image Credit source: instagram
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 27, 2022 | 3:15 PM

मुंबई: पाकिस्तानचा (Pakistan) वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनवर (mohammad hasnain) अलीकडेच गोलंदाजीच्या संशयास्पद अॅक्शनमुळे बंदी घालण्यात आली होती. त्याच्या Action ची चौकशी झाली. त्यानंतर त्याच्यावर घालण्यात आलेली बंदी हटवण्यात आली. आता मोहम्मद हसनैनने पुनरागमनानंतर आपला जलवा दाखवला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हसनैन सध्या इंग्लिश काउंटी डिविजन 2 मध्ये खेळत आहे. वूस्टरशरसाठी खेळणाऱ्या मोहम्मद हसनैनने डर्बीशर विरुद्ध पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या. यातला त्याने घेतलेला एक विकेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

मोहम्मद हसनैनचा खतरनाक यॉर्कर

मोहम्मद हसनैनने डर्बीशर विरुद्ध पहिल्या डावात दोन विकेट घेतल्या. यातला एक विकेट खूपच शानदार होता. पाहणाऱ्यांनी त्याचं कौतुक केलं. हसनैनने डर्बीशरचा फलंदाज अनुज डलला बोल्ड केलं. हा चेंडू इतका वेगात आला की, फलंदाजाला कळलाच नाही.

गोळीच्या वेगाने यॉर्कर

हसनैनने गोळीच्या वेगाने यॉर्कर चेंडू टाकला. हा चेंडू स्विंगिंग यॉर्कर होता. फलंदाजाला या चेंडूने फारशी हालचाल करण्याची संधीच दिली नाही. थेट दांडी गुल केली. वेगच हसनैनची ताकत आहे. तो 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो. सध्या तो पाकिस्तानी संघाबाहेर आहे.

पहिल्या डावात गोलंदाजांचा जलवा

डर्बीशर आणि वूस्टरशर मध्ये सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या डावात गोलंदाजांचा जलवा पहायला मिळाला. पहिल्या डावात डर्बीशरचा संघ 51.1 षटकात 130 धावात ऑलआऊट झाला. वूस्टरशरलाही पहिल्याडावात 185 धावाच करता आल्या. डर्बीशरने दुसऱ्याडावात चांगली फलंदाजी केली. वेन मॅडसेनने 69 धावा केल्या. अनुज डल पुन्हा एकदा सुंदर इनिंग खेळला त्याने अर्धशतक झळकावलं. खेळ संपताना अनुज 85 धावांवर नाबाद होता.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें