PAK VS AUS: Shaheen Afridi ने आधी वॉर्नरला ठसन दिली, आता दांडी उडवली, एकदा बघाच, हा ‘कडक’ VIDEO

PAK VS AUS: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी (Pakistna vs Australia third test) सामना सुरु आहे. आज चौथ्यादिवशी ऑस्ट्रेलियन ओपनर डेविड वॉर्नर (David warner) आणि उस्मान ख्वाजाने टीमला शानदार सुरुवात दिली.

PAK VS AUS: Shaheen Afridi ने आधी वॉर्नरला ठसन दिली, आता दांडी उडवली,  एकदा बघाच, हा 'कडक' VIDEO
पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया कसोटी Image Credit source: PCB TWITTER
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 2:26 PM

लाहोर – पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिसरा कसोटी (Pakistna vs Australia third test) सामना सुरु आहे. आज चौथ्यादिवशी ऑस्ट्रेलियन ओपनर डेविड वॉर्नर (David warner) आणि उस्मान ख्वाजाने टीमला शानदार सुरुवात दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी झाली. वॉर्नरने अर्धशतकही झळकावलं. पण हाफ सेंच्युरीनंतर वॉर्नर फारवेळ खेळपट्टीवर टिकला नाही. शाहिन आफ्रिदीने (Shaheen Afridi) एका अप्रतिम चेंडूवर त्याच्या दांड्या गुल केल्या. शाहिन आफ्रिदीने टाकलेला हा चेंडू इतका जबरदस्त होता की, डेविड वॉर्नरला आपण बोल्ड कसे झालो, ते कळलच नाही. डेविड वॉर्नरने 51 धावा केल्या. वॉर्नर खेळपट्टीवर स्थिरावला होता. चेंडू त्याला फुटबॉलसारखा दिसत होता. पण अखेर शाहिन आफ्रिदीच्या एका शानदार चेंडूवर वॉर्नर फसला. आफ्रिदीने वॉर्नरची विकेट काढल्याचा हा व्हिडिओ पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने टि्वटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. वॉर्नरला त्याने ज्या पद्धतीने बाद केलं, ते खरोखरच अद्भूत होतं.

पण चेंडूने त्याचा ऑफ स्टंम्प उडवला होता

29 व्या षटकात चेंडू जुना झाल्यामुळे गोलंदाजाला फार अशी विशेष मदतीची अपेक्षा नव्हती. वॉर्नर खेळपट्टीवर स्थिरावला होता. पण त्याचवेळी शाहिन आफ्रिदीच्या एका सुंदर रिव्हर्स स्विंगने वॉर्नरचा खेळ संपवला. शाहिनने टाकलेला चेंडू हवेतच आतल्या बाजूला आला आणि पीचवर पडल्यानंतर बाहेर निघाला. वॉर्नर फ्रंट फुटवर डिफेंस करत राहिला पण चेंडूने त्याचा ऑफ स्टंम्प उडवला होता. बुधवारी शाहिन आफ्रिदी आणि डेविड वॉर्नरने परस्परांना जोरदार ठसन दिली होती. आज वॉर्नरची विकेट काढून आफ्रिदीने गोलंदाजीतून स्वत:ला सिद्ध केलं.

आफ्रिदीच्या आधी स्टार्कने दाखवली रिव्हर्स स्विंगची जादू

लाहोर कसोटीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज रिव्हर्स स्विंगची करामत दाखवत आहेत. एकापेक्षा एक सरस विकेटस या कसोटीत पहायला मिळाले आहेत. शाहिन आफ्रिदीच्या आधी काल ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने रिव्हर्स स्विंगची जादू दाखवली होती. स्टार्कने फवाद आलम आणि मोहम्मद रिझवानला रिव्हर्स स्विंगवर बोल्ड केलं होतं.

कोणी किती विकेट काढल्या?

पाकिस्तानचा पहिला डाव फक्त 268 धावात आटोपला. स्टार्कने चार आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन कमिन्सने पाच विकेट काढल्या. लाहोरच्या ज्या पीचवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय, तिथेच स्टार्क आणि कमिन्सने पहिल्या डावात पाकिस्तानला झटके दिले.

नव्या चेंडूकडून मदत मिळत नाहीय, पण…

पाकिस्तानात सुरु असलेल्या या कसोटी मालिकेत वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूकडून कुठलीही मदत मिळत नाहीय. पण चेंडू जुना झाल्यानंतर रिव्हर्स स्विंग होतोय. त्यामुळे फलंदाजांना बऱ्याच अडचणी येत आहेत. शाहिन आफ्रिदी नव्या चेंडूवर महागडा गोलंदाज ठरला. पण चेंडू जुना झाल्यानंतर आपल्या गोलंदाजीची धार दाखवली.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.