AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक कामगिरी, रोहित शर्मा याच्या नेतृत्वात एकेकाला ठोकून काढलं

मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम का आहे, हे सिद्ध करुन दाखवलंय. रोहित शर्माच्या नेतृत्वात पलटणने मोठी कामगिरी केलीय.

Mumbai Indians | मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक कामगिरी, रोहित शर्मा याच्या नेतृत्वात एकेकाला ठोकून काढलं
| Updated on: May 04, 2023 | 5:38 PM
Share

मोहाली | आयपीएल 16 व्या हंगामात बुधवारी 3 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईचा हा या मोसमातील 5 वा विजय ठरला. तसेच यासह मुंबईने पंजाबवर मात करत मागील पराभवाचा वचपा घेतलाच. पंजाबने पहिले बॅटिंग करताना मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईकडून इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी विजयात मोठी भूमिका बजावली. इशानने 75 आणि सूर्याने 66 रन्स केल्या होत्या.

मुंबई इंडियन्सने या विजयासह मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर इतिहास रचला. मुंबई या स्टेडियममध्ये 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारी पहिली टीम ठरली. विशेष बाब म्हणजे मुंबईने 3 दिवसांमध्ये 2 वेळा मोठी कामगिरी केली. मुंबई पंजाब आधी राजस्थान रॉयल्स विरुद्ध भिडली होती. मुंबईने राजस्थानवर 3 बॉल राखून 6 विकेटसने विजय मिळवला होता. मुंबई तेव्हा वानखेडे स्टेडियमवर 200 पेक्षा अधिक रन्सचं यशस्वी पाठलाग पहिली टीम ठरली. मुंबई अशा प्रकारे 3 दिवसांमध्ये 2 वेळा वानखेडे आणि त्यानंतर आयएस बिंद्रा स्टेडियमवर 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारी पहिली टीम ठरली.

मुंबई इंडियन्स चेज मास्टर

मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये संयुक्तरित्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारी तिसरी टीम आहे. आयपीएल इतिहासात सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम हा राजस्थान रॉयल्सच्या नावावर आहे. राजस्थानने 2020 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध 224 धावांचा पल्ला गाठला होता. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा नंबर लागतो. मुंबईने 2021 मध्ये चेन्नई विरुद्ध 219 रन्सचं टार्गेट चेज केलं होतं.

त्यानंतर राजस्थान आणि मुंबई संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थानने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्स विरुद्ध आणि मुंबईने बुधवारी पंजाब विरुद्ध 215 रन्सचं विनिंग टार्गेट पूर्ण केलं.

मुंबईची या संघांसोबत बरोबरी

मुंबई इंडियन्सने पंजाबवर विजय मिळवत आणखी एका महारेकॉर्डची बरोबरी केली. मुंबईची ही या सिजनमधील 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा दुसरी वेळ ठरली. यासह मुंबईने चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सची बरोबरी केली. चेन्नईने 2018 आणि पंजाबने 2014 मध्ये एकाच सिजनमध्ये 2 वेळा 200 पार धावांचं विजयी आव्हान पूर्ण केलं होतं.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल आणि अर्शद खान.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.