PBKS vs MI : सूर्यकुमार यादवचं जोरदार अर्धशतक, पंजाब किंग्सची धुलाई

Suryakumar Yadav Fifty : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झिरोवर आऊट झालेल्या मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवने पंजाब किंग्स विरुद्ध अर्धशतक ठोकलंय.

PBKS vs MI : सूर्यकुमार यादवचं जोरदार अर्धशतक, पंजाब किंग्सची धुलाई
Follow us
| Updated on: Apr 18, 2024 | 9:05 PM

मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे. पंजाबने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र ईशान किशन मुंबईचा 18 स्कोअर असताना 8 धावा करुन आऊट झाला. ईशान किशननंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला. सूर्यकुमार यादव चेन्नई विरुद्धच्या सामन्यात झिरोवर आऊट झाला होता. त्यामुळे सूर्यकुमारसमोर मोठी खेळी करण्याचं आव्हान होतं. सूर्यकुमारने अर्धशतक ठोकून आपल्या दबाव कमी केला. सूर्यकुमारने मुंबईच्या डावातील 11 व्या ओव्हरमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सूर्याने 34 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 147.06 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक झळकावलं. सूर्याचं हे आयपीएल कारकीर्दीतील 23 वं अर्धशतक ठरलं.

दुसऱ्या विकेटसाठी 81 धावंची भागीदारी

दरम्यान रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित शर्मा आऊट झाला. रोहितने 25 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली. रोहितनंतर तिलक वर्मा मैदानात आला. सूर्यकुमारने तिलकसह अर्धशतकानंतर फटकेबाजी केली. सूर्याने 70 धावांचा टप्पा पार केला. मुंबईच्या हातात विकेट्स असल्याने सूर्याला शतकाची संधी होती. मात्र सूर्यकुमार दुर्देवी ठरला.

पंजाबचा कॅप्टन सॅम करन याने सूर्यकुमार यादव याला मुंबईच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर प्रभासिमरन सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं. प्रभासिमरने सूर्याचा अफलातून कॅच घेतला. सूर्याने 53 बॉलमध्ये 7 चौकार आणि 3 सिक्सच्या मदतीने 147.17 च्या स्ट्राईक रेटने 78 धावांची खेळी केली.

सूर्याचं दमदार अर्धशतक

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), रिली रोसो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

मुंबई इंडियन्स प्लेईंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल आणि जसप्रीत बुमराह.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.