Babar Azam असा कसा कॅप्टन? शतकाच्या नादात स्वत:च्या टीमला बुडवलं

Babar Azam Century :T20 मध्ये 240 खूप मोठी धावसंख्या आहे. पण इतक्या धावा करुनही टीमच्या पराभवाला बाबर आजम ठरला कारणीभूत कसं ते समजून घ्या. बाबर आजमच चुकलं कुठे?

Babar Azam असा कसा कॅप्टन? शतकाच्या नादात स्वत:च्या टीमला बुडवलं
babar azamImage Credit source: Twitter/psl
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 8:25 AM

Babar Azam Century : बाबर आजमने पाकिस्तान सुपर लीगमध्ये आपलं पहिलं शतक झळकावलं. मात्र, तरीही त्याची टीम पेशावर जाल्मीचा पराभव झाला. बाबरच्या शतकाच्या बळावर पेशावर जाल्मीने 240 धावांचा डोंगर उभारला. पण, तरीही क्वेटा ग्लॅडिएटर्सची टीम जिंकली. इतक्या धावा करुनही बाबरची टीम कशी हरली? या पराभवाला कोण जबाबदार? हा प्रश्न निर्माण होतो. या पराभवाला पेशावर जाल्मीची गोलंदाजी एका कारण आहेच, जे इतकी मोठी धावसंख्या डिफेंड करु शकले नाहीत. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर सायमन डुल यांच्यामते या पराभवाला बाबर आजम जबाबदार आहेत. बाबरने फक्त स्वत:चा विचार केल्यामुळे टीम हरली, असं डुल यांना वाटतं.

त्या 16 चेंडूंमुळे पराभव

सायमन डुल यांनी पेशावर जाल्मीचा कॅप्टन बाबर आजमवर मोठा आरोप केलाय. चर्चेमध्ये बोलता, बोलता त्यांनी बाबर टीमच्या आधी स्वत:चा विचार करतो, याकडे लक्ष वेधलं. त्यांनी 16 चेंडूंवर बाबरने मनमानी केल्याचा आरोप केला. हे 16 चेंडू बाबरने टीमच्या हिताचा विचार करुन खेळले असते, तर आज निकाल वेगळा लागला असता.

बाबरने नेमकी काय चूक केली?

T20 क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेट ही बाबर आजमची नेहमीच कमकुवत बाजू ठरलीय. फक्त ते 16 चेंडू सोडल्यास बाबरच्या पीएसएलमधील पहिल्या शतकात काही समस्या नाहीय. सायमन डुल यांनी त्याचा 16 चेंडूंकडे लक्ष वेधलं. बाबर आजम PSL मध्ये पहिल्या शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याने शतकाच्या नादात 16 चेंडूंवर धीम्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली.

44 चेंडूत 80 धावा फटकावून फायदा नाही

“बाबरने PSL मध्ये शतक झळकावणं मोठी बाब आहे. पण त्याने आधी टीमचा विचार करायला हवा होता” असं सायमन डुल म्हणाले. शतकी इनिंग दरम्यान बाबरने 44 चेंडूत 80 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर शतकासाठी 20 धावा करण्यासाठी त्याने 16 चेंडू खर्ची घातले. जेसन रॉयची तुफानी बॅटिंग

क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध बाबर आजमने 65 चेंडूत 115 धावा फटकावल्या. यात 15 चौकार आणि 3 षटकार आहेत. त्याच्या फलंदाजीच्या बळावर पेशावर जाल्मीने 2 विकेटवर 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात जेसन रॉयच्या तुफानी बॅटिंगच्या बळावर क्वेटा टीमने 10 चेंडू आणि 8 विकेट राखून विजय मिळवला.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.