AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदींना या महिला खेळाडूला स्वत:च्या हाताने वाढलं जेवण, Video तुफान व्हायरल

PM Modi and Women Cricket Team: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खेळाडूला स्वत:च्या हाताने जेवण वाढलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

PM मोदींना या महिला खेळाडूला स्वत:च्या हाताने वाढलं जेवण, Video तुफान व्हायरल
PM Modi and Pratika Rawal
| Updated on: Nov 06, 2025 | 6:45 PM
Share

भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत प्रथमच वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. या कामगिरीमुळे महिला संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. यात सर्व 16 खेळाडूंसह प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश होता. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक खेळाडूशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खेळाडूला स्वत:च्या हाताने जेवण वाढलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतीय संघाची सलामीवीर प्रतीका रावलही स्पर्धेदरम्यान जखमी झाली होती, त्यामुळे तिच्या जागी शेफाली वर्माला संधी देण्यात आली होती. त्यामुळे संघाच्या विजयानंतर तिला पदक मिळाले नाही. मात्र तरीही प्रतीका रावल संघासोबत होती. उपांत्य फेरीपूर्वी जखमी झालेली प्रतीका देखील व्हीलचेअरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचली होती. यावेळेसचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर खेळाडू आणि प्रशिक्षक जेवण करत होते. त्यावेळी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे पोहोचले. त्यांनी प्रतीकाच्या आवडता नाश्ता उचलला आणि व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकाला दिला. पंतप्रधानांच्या या कृतीमुळे प्रतीकाला खूप आनंद झाला. तसेच पंतप्रधानांची ही कृती पाहून इतर खेळाडूंनाही आनंद झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच वर्ल्डकप जिंकल्याबद्दल महिला क्रिकेट संघाचे कौतुक केले. तसेच संघाच्या कामगिरीमुळे देशाचे मनोबल वाढवले ​​आहे असं विधान केले. पंतप्रधान म्हणाले की, या खेळाडूंच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे.’ पुढे बोलताना त्यांनी सलग तीन पराभवानंतर भारतीय संघाने केलेल्या पुनरागमनाचे कौतुक केले.

काय म्हणाले PM मोदी?

भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुम्ही सर्वांनी उत्तम काम केले आहे. भारतात क्रिकेट हा केवळ खेळ राहिला नाही तर तो लोकांचे जीवन बनला आहे. क्रिकेटमध्ये सगळं काही चांगलं झालं तर संपूर्ण देशाला आनंद होतो, मात्र काही चुकलं तर संपूर्ण देश नाराज होतो.’ दरम्यान, अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. शेफाली शर्मा (87 धावा आणि 2 विकेट्स) आणि दीप्ती शर्मा (58 धावा आणि 5 विकेट्स ) यांनी शानदार अष्टपैलू कामगिरी केली.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.