AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-इंग्लंड कसोटीत प्रसिद्ध कृष्णाने काय केले? भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं

भारताने पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केलेल्या 475 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 465 धावांवर आटोपला. भारताकडे पहिल्या डावात 6 धावांची आघाडी आहे. असं सर्व चित्र असताना भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने तीन बळी घेत विक्रम नावावर केला आहे.

भारत-इंग्लंड कसोटीत प्रसिद्ध कृष्णाने काय केले? भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं
भारत-इंग्लंड कसोटीत प्रसिद्ध कृष्णाने काय केले? भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असंImage Credit source: George Wood/Getty Images
| Updated on: Jun 23, 2025 | 3:35 PM
Share

भारत आणि इंग्लंड कसोटी सामना आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. पहिल्या डावात भारताकडे 6 धावांची आघाडी असून दुसऱ्या डावात काय करणार याकडे लक्ष लागून आहे. इंग्लंडचा आक्रमक खेळ पाहून दुसऱ्या डावात 350 पार धावा केल्या तर सामना वाचवू शकतात. अन्यथा हा सामना भारताच्या हातून जाऊ शकतो. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक पाच गडी बाद केले. तर प्रसिद्ध कृष्णाने तीन गडी बाद करत दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी गोलंदाज ठरला. प यासह त्याने एक नकोसा विक्रमक आपल्या नावावर केला आहे. प्रसिद्ध कृष्णाने 3 गडी बाद केले असले तरी सर्वात महागडा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या या स्पेलमुळे तो कसोटी क्रिकेटमध्ये नको त्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

प्रसिद्ध कृष्णाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात सहापेक्षा अधिकच्या इकोनॉमी रेटने 128 धावा दिल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक म्हणजे सहाहून अधिक इकोनॉमी रेटने धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने नकोशा विक्रमात मुरली कार्तिकला मागे सोडलं आहे. त्याने 2004 मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहाहून अधिक इकोनॉमी रेटसह 122 धावा दिल्या होत्या. यापुढे जात आता प्रसिद्ध कृष्णाने सहाहून अधिक इकोनॉमी रेटने धावा दिल्या. दुसरीकडे, मोहम्मद सिराजने देखील महागडा स्पेल टाकला. त्यालाही दोन विकेट मिळाल्या.  त्यानेही 27 षटकात 2 विकेट घेत 122 धावा दिल्या.

लीड्सवर पहिल्या डावात इंग्लंडने 465 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 99 आणि ओली पोपने 106 धावांची खेळी केली. भारताने सहा धावांच्या आघाडीसह पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी 2 बाद 90 धावा केल्या. केएल राहुल नाबाद 47, तर शुबमन गिल नाबाद 6 धावांवर खेळत आहे. भारताचा यशस्वी जयस्वाल 4, तर साई सुदर्शन 30 धावा करून तंबूत गेले. आज भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे. त्यानंतर भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. भारतीय गोलंदाजांना दुसऱ्या आणखी भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे. एकट्या जसप्रीत बुमराहने विजय मिळवणं शक्य नाही.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.