Prithvi Shaw | पृथ्वी शॉ याची डबल सेंच्युरीनंतर प्रतिक्रिया, टीम इंडियात कमबॅकबाबत काय म्हणाला?
Prithvi Shaw On Selection Committee | पृथ्वी शॉ टीम इंडियातून गेले अनेक बाहेर आहे. पृथ्वीने वनडे कपमध्ये द्विशतक ठोकल्यानंतर निवड समितीतबाबत विधान केलं आहे.

इंग्लंड | टीम इंडियाचा बॅट्समन पृथ्वी शॉ याने इंग्लंडमध्ये सुरु असेलल्या वनडे कपमध्ये द्विशतक ठोकलं. पृथ्वीच्या लिस्ट ए करियरमधील हे दुसरं द्विशतक ठरलं. पृथ्वीने नॉर्थहॅम्प्टनशायरकडून खेळताना समरसेट विरुद्ध ही कामगिरी केली. पृथ्वीने फक्त 153 बॉलमध्ये 28 चौकार आणि 11 खणखणीत षटकार ठोकले. पृथ्वीने या खेळीसह निवड समितीला आणि टीकाकारांना तोंडाने नाही, तर बॅटने उत्तर दिलं. पृथ्वीने या खेळीनंतर निवड समितीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पृथ्वी काय म्हणाला हे आपण जाणून घेऊयात.
पृथ्वी शॉ काय म्हणाला?
“निश्चितपणे मी इथे अनुभवसाठी खेळतोय. निवड समिती काय विचार करतये याबाबत मी विचार करत नाहीये. पण मला इथे क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. नॉर्थम्पटनशर क्रिकेट टीमने मला संधी दिली. टीम मॅनेजमेंट माझी काळजी घेत आहेत. मी त्याचा आनंद घेतोय.”, असं पृथ्वी सामन्यानंतर म्हणाला.
“कडक उन निघत होतं. इंग्लंडमधील हवामान भारतात असतं तसंच होतं. मी कशाचाही विचार करत नव्हतो. बॅटला इनसाईड एज लागल्यानंतर आऊट झालो नाही, तिथेच समजलो की आज माझा दिवस आहे. कधी कधी आपलं नशिब जोरात असतं, त्यामुळे आज माझा दिवस होता. मी 150 धावा केल्या तेव्हा विचार केला की मोठी खेळी करण्याचा आजचा दिवस आहे”, असं पृथ्वीने नमूद केलं.
“प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या डोक्यात 227 रन्स हा आकडा होता. मी सॅम वाईटमॅनला म्हणालो की 227 माझा हायस्कोअर ठरेल”. “, असंही पृथ्वी म्हणाला.
नॉर्थहॅम्प्टनशायर प्लेईंग इलेव्हन | लुईस मॅकमॅनस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, एमिलियो गे, रिकार्डो वास्कोनसेलोस, सॅम व्हाइटमन, ल्यूक प्रॉक्टर, रॉब केओघ, टॉम टेलर, जस्टिन ब्रॉड, सायमन केरिगन आणि जॅक व्हाईट.
समरसेट प्लेईंग इलेव्हन | जॉर्ज थॉमस, अँड्रयू उमेद, लुईस गोल्डस्वर्थी, जेम्स रिव, शॉन डिक्सन, जॉर्ज बार्टलेट, कर्टिस कॅम्फर, डॅनी लॅम्ब, नेड लिओनार्ड, जॅक ब्रूक्स आणि शोएब बशीर.
