VIDEO | पाकिस्तानी खेळाडूंमध्ये राडा, कॅच सोडल्याचा राग, हारिस रौफने कामरानच्या कानफटात खेचली

पाकिस्तान सुपर लीग 2022 (Pakistan Super League) ही क्रिकेट स्पर्धा खेळापेक्षा मैदानावरील खेळाडूंमधील वादांमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच स्पर्धेचं व्यवस्थापन करण्यात पाकिस्तान बोर्ड अपयशी ठरल्याचं अनेक वेळा निदर्शनास आलं आहे. लीगमध्ये सहभागी झालेले अॅलेक्स हेल्स आणि पॉल स्टर्लिंगसारखे अनेक विदेशी खेळाडू वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

VIDEO | पाकिस्तानी खेळाडूंमध्ये राडा, कॅच सोडल्याचा राग, हारिस रौफने कामरानच्या कानफटात खेचली
Haris Rauf - Kamran Ghulam
अक्षय चोरगे

|

Feb 22, 2022 | 11:26 AM

कराची: पाकिस्तान सुपर लीग 2022 (Pakistan Super League) ही क्रिकेट स्पर्धा खेळापेक्षा मैदानावरील खेळाडूंमधील वादांमुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच स्पर्धेचं व्यवस्थापन करण्यात पाकिस्तान बोर्ड अपयशी ठरल्याचं अनेक वेळा निदर्शनास आलं आहे. लीगमध्ये सहभागी झालेले अॅलेक्स हेल्स आणि पॉल स्टर्लिंगसारखे अनेक विदेशी खेळाडू वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरने (James Faulkner) पैसे न मिळाल्याचा आरोप करत लीग अर्ध्यावरच सोडली. एवढेच नाही तर हॉटेलच्या मालमत्तेचेही नुकसान केल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता आणखी एक वाद समोर आला आहे. सोमवारी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफने (Haris Rauf) त्याचा सहकारी खेळाडू कामरान गुलामला (Kamran Ghulam) कानशीलात लगावली. विकेट घेतल्यानंतर जल्लोष करताना त्याने हे कृत्य केले. मात्र काही जण ही एक गंमदीदार घटना असल्याचे सांगत रौफचं समर्थन करत आहेत.

रौफने लाहोर कलंदरमधल्या आपल्या सहकाऱ्यावरचं फ्रस्ट्रेशन काढलं?

लाहोर कलंदर विरुद्ध पेशावर झल्मीमध्ये खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात या घटनेपूर्वी कामरान गुलामने पेशावरच्या हजरतुल्ला जझाईचा झेल सोडला होता. जझाईने हारिस रौफचा चेंडू लेग साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुलामला चेंडू पकडता आला नाही. तेव्हा रौफ गुलामवर चिडला होता. मात्र, त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर फवाम अहमदने सुरेख झेल टिपत मोहम्मद हारीसला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सेलिब्रेशन सुरू असतानाच गुलाम रौफकडे टाळी देण्यासाठी पोहोचला आणि तेव्हा रौफने त्याच्या कानशीलात लगावली.

कामरान हसत असला तरी रौफने त्याच्याकडे रागाने पाहिले. विशेष म्हणजे 17 व्या षटकात गुलाम गोलंदाजीला आला. तेव्हा त्याने पेशावरचा कर्णधार वहाब रियाझला बाद केले. त्यानंतर सेलिब्रेशनवेळी रौफ आला आणि त्याने गुलामला मिठी मारली. तेव्हा दोघांमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचं पाहायला मिळालं.

व्हिडीओ पाहा

कारवाई होणार?

हारिस रौफला मैदानावर केलेल्या कृतीचे काही परिणाम भोगावे लागणार का? हे पाहावे लागेल. 2016 च्या PSL मध्ये वहाब रियाझ आणि अहमद शहजाद भिडले होते. अहमदने या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला डिवचलं होतं. त्यानंतर चिडलेला रियाझ शहजादला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला होता. हे भांडण वाढण्यापूर्वीच इतर खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर शहजादला मॅच फीच्या 30 टक्के आणि रियाझला 40 टक्के दंड ठोठावण्यात आला.

संबंधित बातम्या

IND vs SL:’जो पर्यंत मी BCCI मध्ये आहे, तो पर्यंत तू संघामध्ये राहशील’, साहाचा सौरव गांगुलीबद्दल धक्कादायक खुलासा

Wriddhiman Saha च्या ट्विट, इंटरव्ह्यूप्रकरणी BCCI ॲक्शन मोडवर, दोषींवर कारवाई करणार

Wriddhiman Saha: ऋद्धीमान साहाच्या आरोपावर राहुल द्रविड यांनी सोडलं मौन, म्हणाले…

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें