AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PSL 2026: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अडचणीत, खेळाडूंकडून अतिरिक्त पैशांची मागणी; कारण की…

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आली. पण पाकिस्तानमधील दहशतवादी वातावरण काही क्रिकेटसाठी पूरक नाही. त्यामुळे अनेक विदेशी खेळाडू एका पाठोपाठ एक स्पर्धा सोडत आहेत. असं असताना आणखी एक अडचण समोर उभी राहिली आहे.

PSL 2026: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अडचणीत, खेळाडूंकडून अतिरिक्त पैशांची मागणी; कारण की...
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अडचणीत, खेळाडूंकडून अतिरिक्त पैशांची मागणी; कारण की...Image Credit source: PTI
| Updated on: Mar 23, 2026 | 8:29 PM
Share

पाकिस्तान सुपर लीग 2026 स्पर्धेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन सुरळीतपणे पार पडावे, हे पीसीबीचे सध्याचे उद्दिष्ट आहे. या स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अडचणीत आलं आहे. आयपीएल स्पर्धेला आव्हान देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तसंच वेळापत्रक निवडलं आहे. पण आता हाच निर्णय अंगलट येताना दिसत आहे. आयपीएल लोकप्रियतेपुढे पीएसएल कुठेच नाही. कारण अनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यात जे खेळाडू खेळणार आहेत त्यांनी अतिरिक्त पैशांची मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पीसीबी सध्या खेळाडू करार मोडून जात असल्याने अडचणीत आली आहे. त्यात इराण इस्राईल युद्धामुळे काही खेळाडूंनी मानधनात वाढ करण्याची मागणी केली आहे. मानधन वाढवून मागणाऱ्या खेळाडूंची नावं अद्याप समोर आलेली नाहीत.

रिपोर्टनुसार, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच माघार घेणऱ्या खेळाडूंवर काय करावी याबाबत पीसीबी संभ्रमात आहे. त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दुसरीकडे, फ्रेंचायझींकडून दबाव वाढत आहे. स्पर्धेतून माघार घेतलेल्या खेळाडूंवर दोन ते चार वर्षांची बंधी घालावी अशी मागणी होत आहे. पण जर असं काही केलं तर पाकिस्तान सुपर लीग स्पर्धा अडचणीत येऊ शकते. कारण अशी कारवाई केली तर भविष्यात विदेशी खेळाडू स्पर्धेत भाग घेणार नाहीत. त्यामुळे खेळाडूंची जुळवाजुळव करणं कठीण जाईल. आयपीएल स्पर्धेच्या आयोजनासोबत पीएसएल आयोजन होत असल्याने चांगल्या खेळाडूंसाठी आयपीएलचा पर्याय असेल.

सध्या पाकिस्तान सुपर लीगची स्थिती पाहता पीसीबी आयसीसीकडे दाद मागण्याची शक्यता आहे. पीएसएल सोडून खेळाडू आयपीएल खेळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. पीएसएलमध्ये एकदा निवड झाली तर त्यांनी लीग सोडू नये असा प्रस्ताव पीसीबी आयसीसीपुढे ठेवणार आहे. वेस्ट इंडिजचे खेळाडू गुडकेश मोती व जॉन्सन चार्ल्स, दसुन शनाका, ब्लेसिंग मुझारबानी, स्पेन्सर जॉन्सन व जेक फ्रेझर-मॅकगर्क, ओटनेल बार्टमन, रहमानुल्ला गुरबाज आणि टायमल मिल्स यांनी पीएलमधून माघार घेतली आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक