AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kieron Pollard : 800 SIX, 12000 रन्स….कायरन पोलार्डची पाकिस्तानात कमाल

Kieron Pollard : कायरन पोलार्डने शाहीन शाह आफ्रिदीला समोर मारलेला खणखणीत SIX एकदा पहा VIDEO. 800 सिक्स, 12000 धावा करुनही कायरन पोलार्ड टॉपवर नाहीय. मग पहिल्या स्थानावर कोण आहे?

Kieron Pollard : 800 SIX, 12000 रन्स....कायरन पोलार्डची पाकिस्तानात कमाल
Kieron Pollard Image Credit source: psl
| Updated on: Mar 05, 2023 | 8:32 AM
Share

Kieron Pollard : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्ड्सला सलाम केला जातो, तसंच T20 क्रिकेटमध्ये कायरन पोलार्डच नाव अदबीने घेतलं जातं. T20 क्रिकेटमध्ये कायरन पोलार्डच्या नावावर शानदार रेकॉर्ड़्स आहेत. कायरन पोलार्ड सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतोय. त्याने पीएसएलच्या 20 व्या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय. पाकिस्तानात खेळताना कायरन पोलार्डने T20 क्रिकेटमध्ये आपले 800 सिक्स पूर्ण केले. वेस्ट इंडिजचा हा माजी कॅप्टन पीएसएल लीगमध्ये मुल्तान सुल्तांसकडून खेळत होता. त्याने 3 सिक्स मारले.

कायरन पोलार्डचे T20 क्रिकेटमध्ये 800 सिक्स पूर्ण झाले आहेत. पोलार्डने करिअरमधील 550 व्या टी 20 सामन्यात हा टप्पा गाठला. 800 सिक्स मारुनही पोलार्ड पहिल्या नंबरवर नाहीय.

800 सिक्स मारुनही पोलार्ड नंबर 1 नाही

कायरन पोलार्डने T20 क्रिकेटमध्ये भले 800 सिक्स मारले असतील, पण टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्यामध्ये वेस्ट इंडिजचाच ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे. ख्रिस गेलने 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 1056 सिक्स मारलेत. त्याने 455 इनिंगमध्ये हा कारनामा केलाय. सिक्स मारण्यात टॉप 3 मध्ये वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत.

12,000 धावा बनवूनही टॉपवर नाही

पोलार्डने सिक्स मारण्याबरोबरच पाकिस्तान सुपर लीगच्या 20 व्या सामन्यात आणखी एक टप्पा गाठला. त्याने T20 क्रिकेटमध्ये आपल्या 12,000 धावा पूर्ण केल्या. पोलार्डने लाहोर कलंदर्स विरुद्ध 16 वी धावा घेताच त्याच्या 12 हजार धावा पूर्ण झाल्या. सर्वाधिक टी 20 धावांच्या बाबतीत पोलार्ड दुसऱ्या नंबरवर आहे. 14562 धावा बनवून गेल टॉपवर आहे. टीमला विजय मिळवता आला नाही

पोलार्डने पीएसएलच्या सामन्यात करिअरमधील दोन महत्त्वाचे टप्पे गाठले. पण तो लाहोर विरुद्ध आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. लाहोर कलंदर्सने 20 ओव्हर्समध्ये 180 धावा केल्या होत्या. मुल्तान सुल्तांसच्या टीमने 159 धावा केल्या. पोलार्डने सर्वाधिक 39 धावांच योगदान दिलं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.