AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs GT Live Streaming : पंजाब किंग्स-गुजरात टायटन्स सज्ज, कोण जिंकणार पहिला सामना?

Punjab Kings vs Gujarat Titans IPL 2026 Live Scorecard : पंजाब किंग्स आपल्या घरच्या मैदानात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध खेळणार आहे.

PBKS vs GT Live Streaming : पंजाब किंग्स-गुजरात टायटन्स सज्ज, कोण जिंकणार पहिला सामना?
Punjab Kings vs Gujarat TitansImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 31, 2026 | 5:36 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील(IPL 2026) चौथ्या सामन्यात गतउपविजेता पंजाब किंग्स विरुद्ध 2022 मधील चॅम्पियन टीम गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या पर्वातील पहिलाच सामना असणार आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचं  नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सच्या नेतृत्वाची धुरा आहे. दोन्ही संघांनी पहिल्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे  दोन्ही संघ पहिल्या सामन्याठी सज्ज आहेत.  त्यामुळे कोणता संघ विजयी सुरुवात करण्यात यशस्वी ठरतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कधी?

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मंगळवारी 31 मार्चला खेळवण्यात येणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना कुठे?

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना न्यू चंडीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स हेड टु हेड रेकॉर्ड्स

स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. पंजाबने या 6 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर गुजरातने 3 वेळा पंजाबला पराभूत केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी बरोबरीत आहे. तसेच दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना कडवी झुंज पाहायला मिळू शकते.

दरम्यान दोन्ही संघांनी गेल्या 15 व्या मोसमातील आपला पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळला होता. या हायस्कोअरिंग झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी जोरदार लढत दिली होती. मात्र अखेरच्या क्षणी पंजाब वरचढ ठरली. पंजाबने गुजरातसमोर 244 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र गुजरातला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 232 धावांपर्यंतच मजल मारता आली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...