AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI Score Updates and Highlights, IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने विजय, पंजाब किंग्सचं पराभवामुळे समीकरण बिघडलं

| Updated on: May 15, 2026 | 8:56 AM
Share

Punjab Kings vs Mumbai Indians Indian Premier League 2026 Score Updates and Highlights In Marathi : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये 6 विकेट्सने धुव्वा उडवला. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात मुंबईने ही कामगिरी केली.

PBKS vs MI Score Updates and Highlights, IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने विजय, पंजाब किंग्सचं पराभवामुळे समीकरण बिघडलं
PBKS vs MI IPL 2026 Live UpdatesImage Credit source: TV9

मुंबई इंडियन्सने 14 मे रोजी जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सवर 6 विकेट्सने विजय मिळवत 2 गुणांची कमाई केली. मुंबईचा हा 19 व्या मोसमातील चौथा विजय ठरला. मुंबई विरुद्ध पंजाब किंग्स या दोन्ही संघांची ही या मोसमातील दुसरी वेळ होती. पंजाबने मुंबईला पहिल्या सामन्यात पराभूत केलं होतं. त्यामुळे मुंबईला गेल्या पराभवाचा हिशोब करायचा होता. मुंबई पंजाबचा हिशोब करण्यात यशस्वी ठरली. पंजाबने मुंबईसमोर धर्मशालेतील स्टेडियममध्ये 201 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. तिलक वर्मा आणि शार्दूल ठाकुर हे दोघे मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. शार्दूल ठाकुर याने आधी पंजाबला सर्वाधिक 4 झटके दिले. त्यानंतर तिलकने नाबाद 75 धावा करुन मुंबईला विजयी केलं. तिलकला त्याने केेलेल्या कामगिरीसाठी मॅन ऑफ दॅ मॅच पुरस्कारने गौरवण्यात आलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 14 May 2026 11:22 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला नमवलं

    आयपीएल 2026 स्पर्धेतील 58व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सला 6 गडी राखून पराभूत केलं. पंजाब किंग्सने विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 19.5 षटकात मुंबई इंडियन्सने पूर्ण केलं. या पराभवामुळे पंजाब किंग्सचं प्लेऑफचं गणित चुकलं आहे. सलग पाचवा पराभव झाल्याने आता उर्वरित दोन सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे.

  • 14 May 2026 11:04 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : तिलक वर्माची अर्धशतकी खेळी

    तिलक वर्माने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. षटकार मारला आणि अर्धशतक साजरं केलं. पण मुंबई  इंडियन्सपासून विजय अजूनही दूर आहे. त्यामुळे मोठ्या फटक्यांची गरज आहे.

  • 14 May 2026 11:00 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : मुंबई इंडियन्सला चौथा धक्का, रदरफोर्ड 20 धावा करून बाद

    मुंबई इंडियन्सला चौथा धक्का बसला आहे. रदरफोर्ड 21 चेंडूत 20 धावांची खेळी करून बाद झाला. त्यामुळे पंजाब किंग्सच्या पारड्यात सामना झुकला आहे.

  • 14 May 2026 10:55 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : तिलक वर्मा आणि रदरफोर्ड जोडी जमली, 50हून अधिक धावांची भागीदारी

    तिलक वर्मा आणि रदरफोर्ड जोडी जमली असून या जोडीने चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली आहे. अजूनही मुंबई इंडियन्सला 24 चेंडूत 53 धावांची गरज आहे.

  • 14 May 2026 10:21 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का, रोहित शर्मा क्लिन बोल्ड

    मुंबई इंडियन्सला रोहित शर्माच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे. रोहित शर्माने 26 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला.

  • 14 May 2026 10:12 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : मुंबई इंडियन्सला दुसरा धक्का, नमन धीर बाद

    मुंबई इंडियन्सला 81 धावा असताना दुसरा धक्का बसला आहे. नमन धीर 6 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. दुसरी विकेट पडल्यानंतर पंजाब किंग्सच्या विजयाच्या आशा उंचावल्या आहेत.

  • 14 May 2026 10:02 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, रिकल्टन बाद

    मुंबई इंडियन्सला रियान रिकल्टनच्या रूपाने पहिला धक्का बसला आहे. रिकल्टनने 23 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत 48 धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकलं.

  • 14 May 2026 09:59 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : पावरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सच्या बिनबाद 59 धावा

    पावरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सने बिनबाद 59 धावा केल्या आहेत. रियान रिकल्टनने  47 धावा, रोहित शर्माने 12 धावांची खेळी केली आहे. 201 धावांचं लक्ष्य गाठताना चांगली सुरूवात झाली आहे.

  • 14 May 2026 09:38 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : रोहित शर्मा-रियान रिकल्टन जोडी मैदानात

    मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रियान रिकल्टन ही जोडी मैदानात आहे. या जोडीने सावध सुरूवात केली आहे. आव्हान मोठं असल्याने प्लेऑफमध्ये चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

  • 14 May 2026 09:23 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : पंजाबचं जोरदार कमबॅक, मुंबई विरुद्ध 20 ओव्हरमध्ये 200 धावा, पलटण जिंकणार?

    पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध धर्मशालेत 200 धावा केल्या आहेत. मुंबईने पंजाबला मधल्या टप्प्यात बॅकफुटवर ढकललं होतं. त्यामुळे मुंबईकडे पंजाबला झटपट गुंडाळण्याची संधी होती. मात्र पंजाबने जोरदार कमबॅक करत पलटणसमोर 201 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे आता पलटण 201 धावा करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • 14 May 2026 09:08 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : अझमतुल्लाह ओमरझईच्या वादळी खेळीचा शेवट, पंजाबला आठवा झटका

    दीपक चाहर याने अझमतुल्लाह ओमरझई याच्या वादळी खेळीचा शेवट केला आहे. ओमरझई याने 17 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 2 फोरसह निर्णायक 38 रन्स केल्या.

  • 14 May 2026 08:58 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : शार्दूलकडून मार्को यान्सेनचा गेम ओव्हर, मुंबई मजबूत स्थितीत

    शार्दूल ठाकुर याने मार्को यान्सेन याला बोल्ड करत पंजाबला सातवा झटका दिला आहे. यान्सेनने 2 धावा केल्या. शार्दुलने यान्सेनला आऊट करत चौथी विकेट मिळवली.

  • 14 May 2026 08:50 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : शशांक सिंह आऊट, पंजाबला सहावा झटका

    कॉर्बिन बॉश याने शशांक सिंह आला आऊट करत पंजाबला सहावा झटका दिला आहे. कॉर्बिनने  शशांकला एलबीडब्ल्यू आऊट केलं. शशांकने 3 बॉलमध्ये 2 धावा केल्या.

  • 14 May 2026 08:43 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : सूर्यांश शेडगे आऊट, शार्दूलकडून तिसरी शिकार, पंजाबचा अर्धा संघ तंबूत

    शार्दूल ठाकुर याने मुंबईकर सूर्यांश शेडगे आला आऊट करत पंजाबला पाचवा झटका दिला. शार्दूलने यासह तिसरी विकेट मिळवली. सूर्यांशने 5 बॉलमध्ये 8 रन्स केल्या.

  • 14 May 2026 08:32 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : जबरदस्त, पंजाबला 8 बॉलमध्ये तिसरा झटका, कूपर कोनोली आऊट

    मुंबई इंडियन्सने जबरदस्त कमबॅक केलं आहे. शार्दूलने पंजाबला डावातील 12 व्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. शार्दूलने प्रभसिमर सिंह आणि श्रेयस अय्यर या दोघांना आऊट केलं. त्यानंतर राज अंगद बावा याने कूपर कोनोली याला आऊट केलं. यासह मुंबईने पंजाबला 8 बॉलमध्ये 3 झटके देत बॅकफुटवर टाकलं आहे.

  • 14 May 2026 08:29 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : शार्दुल ठाकुरची कमाल, पंजाबला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    शार्दूल ठाकुर याने पंजाबला एकाच ओव्हरमध्ये  2 झटके देत मुंबईला कमबॅक करुन दिलं आहे. शार्दूलने सेट प्रभसिमरन सिंह याला आऊट करत पंजाबला दुसरा झटका दिला.  त्यानंतर शार्दूलने कॅप्टन श्रेयस अय्यर याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शार्दुलने पंजाबच्या डावातील 12 व्या ओव्हरमध्ये ही कामगिरी केली.

  • 14 May 2026 08:24 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : मुंबईला मोठी विकेट, सेट प्रभसिमरन सिंह आऊट, पंजाबला दुसरा धक्का

    शार्दूल ठाकुर याने प्रभसिमरन सिंह याला आऊट करत मुंबईला दुसरी विकेट मिळवून दिली आहे. शार्दूलने प्रभसिमरन याला कॉर्बिन बॉश याच्या हाती कॅच आऊट केलं. प्रभसिमरन याने 32 बॉलमध्ये 57 रन्स केल्या.

  • 14 May 2026 08:22 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : प्रभसिमरन सिंह याचं अर्धशतक, पंजाबचं शतक, मुंबई विकेटच्या शोधात

    पंजाब किंग्सचा ओपनर प्रभसिमरन सिंह याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह पंजाने यासह 11 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 100 धावा पूर्ण केल्या आहेत.  प्रभसिमरन सिंह 51 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर कूपर कोनोली नाबाद 21 धावा करुन प्रभसिमरन याला साथ देत आहे.

  • 14 May 2026 07:57 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : दीपक चाहरकडून पंजाबला पहिला झटका, प्रियांश आर्या आऊट

    दीपक चाहर याने पंजाबची प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह ही सेट आणि सलामी जोडी फोडली आहे. या दोघांनी पंजाबसाठी 51 धावांची भागीदारी केली. मात्र दीपकने सहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर प्रियांश आर्या याला बोल्ड केलं. प्रियांशने 17 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.

  • 14 May 2026 07:53 PM (IST)

    PBKS vs MI Live Score Updates : पंजाबच्या सलामी जोडीची जबरदस्त सुरुवात, प्रभसिमरन-प्रियांशची फटकेबाजी

    पंजाबच्या सलामी जोडीने टीमला जबरदस्त सुरुवात करुन दिली आहे. प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या या दोघांनी जोरदार फटकेबाजी करुन पंजाबला 5 ओव्हरनंतर बिनबाद 46 धावांपर्यंत पोहचवलं आहे.

  • 14 May 2026 07:32 PM (IST)

    PBKS vs MI Live Updates : सामन्याला सुरुवात, पंजाबची बॅटिंग, प्रभसिमरन-प्रियांश सलामी जोडी मैदानात

    पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडिनयन्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्या सलामी जोडी मैदानात आली आहे.

  • 14 May 2026 07:11 PM (IST)

    PBKS vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह (कॅप्टन) आणि रघु शर्मा.

  • 14 May 2026 07:10 PM (IST)

    PBKS vs MI Live Updates : पंजाब प्लेइंग ईलेव्हन

    पंजाब प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला ओमरझई, मार्को यान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

  • 14 May 2026 07:03 PM (IST)

    PBKS vs MI Live Updates : मुंबईने टॉस जिंकला, पंजाब विरुद्ध निर्णय काय?

    मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स विरुद्ध टॉस जिंकला आहे. हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराह याने पंजाब विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने पंजाब विरुद्ध 2 बदल केले आहेत. तर पंजाबने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत.

  • 14 May 2026 06:53 PM (IST)

    PBKS vs MI Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार) रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट, रघु शर्मा, मयंक रावत, रॉबिन मिन्झ, शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, हार्दिक पंड्या, केशव महाराज, अश्वनी कुमार,मयंक मार्कंडे, शेरफेन रूदरफोर्ड, दानिश मलेवार, क्रिश भगत आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

  • 14 May 2026 06:50 PM (IST)

    PBKS vs MI Live Updates : पंजाब किंग्स टीम

    पंजाब किंग्स टीम : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, मार्कस स्टॉयनिस, सुर्यांश शेडगे, शशांक सिंग, मार्को यान्सेन, बेन द्वारशुईस, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार, यश ठाकूर, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, लॉकी फर्ग्युसन, अझमतुल्ला उमरझाई, नेहल वढेरा, मिशेल ओवेन, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश आणि विशाल निषाद.

  • 14 May 2026 06:42 PM (IST)

    PBKS vs MI Live Updates : पंजाबसमोर मुंबईचं आव्हान, कोण जिंकणार?

    पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील 12 वा सामना आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

Published On - May 14,2026 6:41 PM

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड