PBKS vs RCB Score Updates and Highlights IPL 2026 : आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक, पंजाबवर 23 धावांनी मात
Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Indian Premier League 2026 Score and Highlights Updates: गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 23 धावांनी मात केली. पंजाबने यासह एकूण आणि सलग सहावा सामना गमावला. यासह पंजाबचं प्लेऑफचं गणित बिघडलं आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आज 17 मे रोजी डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (PBKS vs RCB) आमनेसामने होते. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 13 वा सामना आहे. दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ होती. आरसीबीने या सामन्यात पंजाब किंग्सवर मात करत अधिकृतरित्या प्लेऑफमध्ये धडक दिली. आरसीबीचा हा एकूण नववा विजय ठरला. तसेच आरसीबी 19 व्या मोसमात प्लेऑफमध्ये पोहचणारी पहिलीच टीम ठरली. तसेच पंजाब किंग्स पराभवाची मालिका खंडीत करण्यात अपयशी ठरली. पंजाबचा हा एकूण सलग सलावा पराभव ठरला.
LIVE Cricket Score & Updates
-
PBKS vs RCB Live Score Updates : आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक, पंजाबवर 23 धावांनी मात
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. आरसीबीने पंजाबसमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र पंजाबला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 199 धावांपर्यंतच मजल मारता आली. आरसीबीने अशाप्रकारे 23 धावांनी सामना जिंकला. तर पंजाबचा हा सलग आणि एकूण सहावा पराभव ठरला.
-
PBKS vs RCB Live Score Updates : शशांक सिंह आऊट, आरसीबीचा विजय निश्चित
रसिख सलाम डार याने शशांक सिंह याला विराट कोहली याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. शशांकने 27 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह एकूण 56 धावा केल्या.
-
-
PBKS vs RCB Live Score Updates : शशांक सिंह याचं अर्धशतक, पंजाबला 12 बॉलमध्ये 40 रन्सची गरज
शशांक सिंह याने अर्धशतक पूर्ण केलं आहे. पंजाबने 18 ओव्हरमध्ये 183 रन्स केल्या आहेत. त्यामुळे पंजाबला विजयासाठी 12 बॉलमध्ये आणखी 40 रन्सची गरज आहे.
-
PBKS vs RCB Live Score Updates : मार्कस स्टॉयनिस आऊट, पंजाबला सहावा झटका
जोश हेझलवूड याने निर्णायक क्षणी फुलटॉस बॉलवर मार्कस स्टोयनिस याला एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे. यासह पंजाबने सहावी विकेट गमावली आहे. स्टोयनिसने 25 बॉलमध्ये 37 केल्या.
-
PBKS vs RCB Live Score Updates : स्टॉयनिस-शशांक जोडी जमली, पंजाबला जिंकवणार?
आरसीबीने पंजाबला सूर्यांश शेडगे याला आऊट करत पाचवा झटका दिला. त्यानंतर मार्कस स्टोयनिस आणि शशांक सिंह या दोघांनी पंजाबसाठी जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी पंजाबला 15 ओव्हरपर्यंत 146 रन्सपर्यंत पोहचवलंय. या दोघांनी 25 बॉलमध्ये 53 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली आहे. त्यामुळे पंजाबला शेवटच्या 30 बॉलमध्ये 77 रन्सची गरज आहे. त्यामुळे ही जोडी पंजाबला जिंकवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
PBKS vs RCB Live Score Updates : सूर्यांश शेडगे आऊट, पंजाबला पाचवा झटका
आरसीबीने पंजाबने पाचवा झटका देत सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. सूयश शर्मा याने सूर्यांश शेडगे याला विराट कोहली याच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्यांशने 22 बॉलमध्ये 35 रन्स केल्या.
-
PBKS vs RCB Live Score Updates : कूपर कोनोली आऊट, पंजाबला चौथा झटका
रोमरियो शेपर्ड याने सेट कूपर कोनोली याला आऊट करत पंजाबला चौथा झटका दिला आहे. कूपरने 22 बॉलमध्ये 37 रन्स केल्या. कूपरने या दरम्यान प्रत्येकी 3 सिक्स आणि 3 फोर लगावले.
-
PBKS vs RCB Live Score Updates : कूपर कोनोली-सूर्यांश शेडगे जोडी जमली, पंजाबला मोठ्या भागीदारीची गरज
आरसीबीने पंजाबला पावरप्लेमध्ये 3 झटके दिले. भुवनेश्वर कुमार याने प्रियांश आर्या (0) आणि प्रभसिमर सिंह याला (2) धावांवर आऊट केलं. त्यानतंर रसीख सलीम डार याने कॅप्टन श्रेयस अय्यर याला 1 रन्सवर आऊट केलं. आरसीबीने अशाप्रकारे पंजाबला पावरप्लेमध्ये 3 झटके दिले. त्यानंतर कूपर कोनोली आणि सूर्यांश शेडगे या दोघांनी पंजाबचा डाव सावरला. सूर्यांश आणि कूपर या दोघांनी पंजाबला 6 ओव्हरमध्ये 3 आऊट 49 रन्सपर्यंत पोहचवलंय.
-
PBKS vs RCB Live Score Updates : कॅप्टन श्रेयस अय्यरही आऊट, पंजाबला तिसरा झटका, आरसीबीची कडक सुरुवात
आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने पंजाबच्या सलामी जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर रसीख सलाम दार याने पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यर याला विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. श्रेयस 1 धाव करुन माघील परतला.
-
PBKS vs RCB Live Score Updates : प्रभसिमरन सिंह आऊट, पंजाबला दुसरा झटका, सलामी जोडी झटपट आऊट
भुवनेश्वर कुमार याने पंजब किंग्सच्या सलामी जोडीचा गेम केला आहे. भुवीने प्रियांश आर्या याला झिरोवर आऊट केलं. त्यानंतर भुवीने प्रभसिमरन सिंह याला आऊट करत पंजाबला एकूण दुसरा झटका दिला आहे. प्रभसिमरन सिंह याने 2 धावा केल्या.
-
PBKS vs RCB Live Score Updates : प्रियांश आर्य डक, पंजाबला पहिला झटका
आरसीबीने पंजाबला पहिला झटका दिला आहे. आरसीबीचा स्ट्राईक बॉलर भुवनेश्वर कुमार याने प्रियांश आर्या याला आऊट केलं आहे. भुवीने प्रियांशला भोपळाही फोडून दिला नाही. भुवीने प्रियांशला रोमरियो शेफर्डच्या हाती कॅच आऊट केलं.
-
PBKS vs RCB Live Score Updates : पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात, 223 धावांचं आव्हान
पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. पंजाबकडून प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह ही सलामी जोडी मैदानात आली आहे. आरसीबीने पंजाबसमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
PBKS vs RCB Live Score Updates : पंजाबसमोर 223 धावांचं आव्हान, आरसीबी रोखणार?
विराट कोहली आणि वेंकटेश अय्यंर या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने पंजाब किंग्ससमोर 200 पार मजल मारली आहे. आरसीबीने पंजाबसमोर 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 222 धावा केल्या. त्यामुळे आता पंजाब किंग्स सलग 5 पराभवानंतर 2 गुणांची कमाई करणार की आरसीबी प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
PBKS vs RCB Live Score Updates : आरसीबीचं 18 ओव्हरमध्ये द्विशतक, आणखी किती धावा करणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने 18 ओव्हरमध्ये 200 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता आरसीबी पंजाब विरुद्ध उर्वरित 2 ओवह्र अर्थात 12 बॉलमध्ये किती धावा जोडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
PBKS vs RCB Live Score Updates : वेंकेटश अय्यर याचं अर्धशतक, आरसीबी द्विशतकाच्या दिशेने
वेंकटेश अय्यर याने विराट कोहली याच्यानंतर अर्धशतक झळकावलं आहे, वेकंटेशने 29 बॉलमध्ये षटकारासह हे अर्धशतक पूर्ण केलं. यासह आरसीबीने द्विशतकाच्या दिशेने आगेकूच केली आहे.
-
PBKS vs RCB Live Score Updates : आरसीबीला तिसरा झटका, विराट कोहली आऊट
पंजाब किंग्सने आरसीबीला तिसरा झटका दिला आहे. युझवेंद्र चहल याने विराट कोहली याला आऊट केलं. विराटने 37 बॉलमध्ये 58 रन्स केल्या. विराटने या खेळीत 3 सिक्स आणि 4 फोर लगावले.
-
PBKS vs RCB Live Score Updates : विराट कोहलीचं अर्धशतक, आरसीबी मजबूत स्थितीत
विराट कोहली याने आयपीएल कारकीर्दीतील 67 वं अर्धशतक झळकावलं आहे. विराटने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. विराटने या दरम्यान 3 सिक्स आणि 3 फोर लगावले.
-
PBKS vs RCB Live Score Updates : ब्रारने विराट-पडीक्कल जोडी फोडली, देवदत्त आऊट
हरप्रीत ब्रारने दुसरी विकेट मिळवली आहे. ब्रारने जेकब बेथल याच्यानंतर सेट झालेल्या देवदत्त पडीक्कल याला आऊट केलं. देवदत्तने 25 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.
-
PBKS vs RCB Live Score Updates : विराट-पडीक्कल जोडी जमली, आरसीबी चांगल्या स्थितीत
विराट कोहली आणि देवदत्त पडीक्कल जोडी जमली आहे. विराट आणि देवदत्त या दोघांनी पावरप्लेच्या 6 ओव्हरमध्ये टीमला 61 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. विराट 24 आणि देवदत्त 23 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत. तर जेकब बेथल 7 धावा करुन आऊट झाला.
-
PBKS vs RCB Live Score Updates : आरसीबीला पहिला धक्का, जेकब बेथल आऊट
हरप्रीत ब्रार याने आरसीबीला पहिला झटका दिला आहे. ब्रारने जेकब बेथल याला आऊट केलं आहे. जेकबने 7 बॉलमध्ये 11 रन्स केल्या. आरसीबीने 3 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 27 धावा केल्या आहेत. देवदत्त 6 आणि विराट 9 धावांवर खेळत आहेत.
-
PBKS vs RCB Live Score Updates : सामन्याला सुरुवात, आरसीबीची बॅटिंग, जेकब बेथल-विराट कोहली ओपनिंग जोडी मैदानात
पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याला सुरुवात झाली आहे. पंजाबने टॉस जिंकून आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. आरसीबीकडून विराट कोहली आणि जेकब बेथल ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
-
PBKS vs RCB Live Updates : आरसीबीने कॅप्टन बदलला, जितेश शर्माकडे नेतृत्व
आरसीबीने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन बदलला आहे. रजत पाटीदार याच्या अनुपस्थितीत जितेश शर्मा आरसीबीचं नेतृत्व करणार आहे. जितेशचा कर्णघार म्हणून हा पाचवाच सामना असणार आहे.
-
PBKS vs RCB Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन: जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), टीम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि सुयश शर्मा.
-
PBKS vs RCB Live Updates : पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
-
PBKS vs RCB Live Updates : पंजाबने टॉस जिंकला, आरसीबी विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
पंजाब किंग्सने टॉस जिंकला आहे. श्रेयस अय्यर याने कॅप्टन म्हणून 100 व्या सामन्यात आरसीबी विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पंजाबचे गोलंगदाज आरसीबीला किती धावांवर रोखण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
PBKS vs RCB Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीम : रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, रसिक सलाम दार, जोश हेझलवूड, जेकब डफी, जॉर्डन कॉक्स, मंगेश यादव, रोमारियो शेफर्ड, स्वप्नील सिंग, फिलिप सॉल्ट, रिचर्ड ग्लेसन, सुयश शर्मा, विहान मल्होत्रा, अभिनंदन सिंग, विकी ओस्तवाल, कनिष्क चौहान आणि सात्विक देसवाल.
-
PBKS vs RCB Live Updates : पंजाब किंग्स टीम
पंजाब किंग्स टीम : प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, कूपर कोनोली, सुर्यांश शेडगे, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझई, मार्को जान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विष्णू विनोद, हरप्रीत ब्रार, प्रवीण दुबे, विजयकुमार वैशाख, मिशेल ओवेन, मार्कस स्टॉयनिस, बेन द्वारशुईस, लॉकी फर्ग्युसन, यश ठाकूर, नेहल वढेरा, हरनूर सिंग, मुशीर खान, पायला अविनाश आणि विशाल निषाद.
-
PBKS vs RCB Live Updates : पंजाबसाठी करो या मरो सामना, आरसीबी विरुद्ध जिंकणार?
पंजाब किंग्सने पहिल्या 7 पैकी 6 सामने जिंकले होते. मात्र त्यानंतर पंजाबने सलग 5 सामने गमावले. त्यामुळे आता पंजाबला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित 2 सामने जिंकायचेच आहेत. त्यामुळे पंजाबसाठी रॉयल चॅलेंजर्स विरुद्धचा सामना हा करो या मरो असा आहे. या सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. आरसीबीला हा सामना जिंकून प्लेऑफचं तिकीट निश्चित करण्याची संधी आहे. तर पंजाबसाठी शेवटची संधी आहे. त्यामुळे चाहत्यांना चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.