AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?

Punjab Kings vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Scorecard : श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने अप्रतिम कामगिरी करत आपल्या मोहिमेतील तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर हैदराबाद सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे.

PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
Punjab Kings vs Sunrisers HyderabadImage Credit source: PTI
| Updated on: Apr 11, 2026 | 1:18 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) तिसऱ्या डबल हेडरचा थरार शनिवारी 11 एप्रिलला रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या आणि मोसमातील 17 व्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद भिडणार आहेत. दोन्ही संघांचा हा चौथा सामना असणार आहे. हैदराबादने 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे हैदराबादचा हा सामना जिंकून विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पंजाब या मोसमात अजिंक्य आहेत. पंजाबने तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे हैदराबाद पंजाबचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने सामन्याबाबत काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कधी?

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना शनिवारी 11 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना कुठे?

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅच मोबाईल आणि लॅपटॉपवर पाहता येईल.

पंजाब सरस की हैदराबाद वरचढ?

इतिहासातील आकडेवारी पाहता सनरायजर्स हैदराबाद पंजाब किंग्सवर पूर्णपणे हावी असल्याचं स्पष्ट होतं. उभयसंघात एकूण 24 सामने खेळवण्यात आले आहेत. हैदराबादने 24 पैकी 17 सामने जिंकलेत. तर पंजाब किंग्सला फक्त 7 सामन्यांत विजय मिळवता आला आहे.

पॉइंट्स टेबलची स्थिती काय?

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, पंजाब किंग्स पॉइंट्स टेबलमध्ये 5 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर हैदराबाद 2 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान रॉयल्स पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स टीम या मोसमात सलग आणि एकूण 4 सामने जिंकले आहेत. राजस्थानने शुक्रवारी 10 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत करुन चौथा विजय मिळवला आणि पॉइंट्स टेबलमधील अव्वल स्थान पटकावलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...