AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर अश्विनने आयपीएल रामराम ठोकल्यानंतर पत्नीने व्यक्त केल्या भावना, लिहिलं असं की…

आर अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यानंतर फक्त आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्याने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला आहे. पण पत्नी प्रीति नारायणने खास मेसेज शेअर केला आहे.

आर अश्विनने आयपीएल रामराम ठोकल्यानंतर पत्नीने व्यक्त केल्या भावना, लिहिलं असं की...
आर अश्विनने आयपीएल रामराम ठोकल्यानंतर पत्नीने व्यक्त केल्या भावना, लिहिलं असं की...Image Credit source: Ravichandran Ashwin/ Instagram
| Updated on: Aug 27, 2025 | 4:11 PM
Share

दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा करत क्रीडाविश्वात खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-2025 मालिकेच्या मध्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. आर अश्विनन आंतरराष्ट्रीय पातळीवर 287 सामने खेळला असून 765 विकेट घेतल्या आहेत. मागच्या दोन तीन वर्षात आर अश्विनचा फार काही विचार केला गेला नाही. त्यामुळे त्यामुळे हा निर्णय घेतला असावा असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. आता आर अश्विनने अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून आयपीएल निवृत्तीची माहिती दिली आहे. त्यामुळे आता आर अश्विन देशांतर्गत क्रिकेट मैदानात पुन्हा दिसणार नाही. पण जगभरातील इतर स्पर्धांमध्ये भाग घेऊन खेळ अजून व्यवस्थित समजून घेण्यााच प्रयत्न करणार आहे. तसेच क्रीडात्मक विश्लेषणाकडे त्याचं लक्ष असणार आहे. त्याच्या या निर्णयानंतर पत्नी प्रीति नारायण खूपच खूश आहे. त्याच्या निवृत्तीनंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

प्रीति नारायण हीने अधिकृत सोशल मिडिया खात्यावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात तिने लिहिलं की, ‘आय लव्ह यू… तुला नवीन गोष्टी करताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तू नवीन उंची गाठावी अशी मी प्रार्थना करते. ‘ दुसरीकडे, आर अश्विनच्या या निर्णयामुळे चेन्नई सुपर किंग्स संघाला धक्का बसला आहे. कारण मागच्या पर्वात मेगा लिलावात त्याच्यासाठी चेन्नई सुपर किंग्सने 9.75 कोटी रुपये मोजले होते. पण या पर्वात त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. त्याने 9 सामन्यात फक्त 7 विकेट घेतल्या. तसेच 33 धावा केल्या.  आता आर अश्विनची जागा भरून काढण्याचं आव्हान चेन्नई सुपर किंग्सपुढे असणार आहे. अनुभवी फिरकीपटूच्या बदल्यात संघात कोण जागा घेतो याची उत्सुकता आहे.

Preeti_Narayan

आर अश्विन आयपीएलच्या दुसऱ्या पर्वापासून खेळत आहे. आतापर्यंत पार पडलेल्या 18 पैकी 17 पर्वात आर अश्विन खेळला आहे. अश्विनने 2009 मद्ये चेन्नई सुपर किंग्स संघातून सुरुवात केली. त्यानंतर इतर फ्रेंचायझी बदलत गेल्या. आर अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या 221 सामन्यात 30.23 च्या सरासरीने 187 विकेट घेतल्या. तसेच 118.16 च्या स्ट्राईक रेटने 833 दावा केल्या. आर अश्विनचा 50 हा आयपीएलमधील सर्वोत्तम स्कोअर आहे.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.