टीम इंडिया तिसरी कसोटी दहा खेळाडूंवरच खेळणार, कारण ‘हा’ नियम

IND vs ENG R.Ashwin | भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे. रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी 500 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला होता. यामुळे भारतीय संघ दहा खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया तिसरी कसोटी दहा खेळाडूंवरच खेळणार, कारण 'हा' नियम
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 8:51 AM

राजकोट, दि. 17 फेब्रुवारी 2024 | भारत आणि इंग्लंडमध्ये राजकोटमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात टि्वस्ट निर्माण झाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासमोर नवीन संकट निर्माण झाले आहे. सामन्याचे उर्वरित दिवस भारतीय संघाला अकरा ऐवजी दहा खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. भारताचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा दुसऱ्या दिवसानंतर सामन्यातून बाहेर पडला आहे. रविचंद्रन अश्विन याने शुक्रवारी 500 गडी बाद करण्याचा टप्पा गाठला होता. त्यानंतर त्याला कौटुंबिक कारणामुळे सामना सोडावा लागत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही महिती दिली.

पाच ऐवजी चारच गोलंदाज

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व निर्माण केले होते. ज्या बेसबॉलची सातत्याने चर्चा होत होती, त्याचेच खऱ्या अर्थाने दर्शन शुक्रवारी राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी झाले. शनिवारी इंग्लंडचा संघ बेसबॉल शैलीने खेळत राहिल्यास भारतासमोर संकट निर्माण होणार आहे. कारण आता भारताकडे रविचंद्रन अश्विन नसणार आहे. यामुळे चार गोलंदाजांवर भारताला खेळावे लागणार आहे. तसेच तिसऱ्या दिवशी टीम इंडिया प्लेइंग इलेवनमधील 10 खेळाडूंसोबतच मैदानात उतरणार आहे. भारताला सब्सीट्यूट खेळाडू घेता येणार आहे. परंतु तो गोलंदाजी करु शकणार नाही.

यामुळे बदली खेळाडू नसणार

रविचंद्रन अश्विनचे संघात नसल्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघ केवळ चार गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. फिरकी आक्रमणाची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यावर आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळतील. भारताला फक्त मैदानावर फिल्डिंगसाठी बदली खेळाडू मिळेल. अश्विन याने कौटुंबिक कारणांमुळे मैदान सोडले आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे त्याच्या जागी बदली खेळाडू टीम इंडियाला मिळणार नाही.

हे सुद्धा वाचा

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. त्यात रोहित शर्मा (131) आणि रवींद्र जडेजा (112) यांच्या खेळीमुळे 445 धावा केल्या. त्याला उत्तर देताना इंग्लंडने जोरदार सुरुवात केली. इंग्लंडने 35 षटकात 2 गडी गमावून 207 धावा केल्या. ओपनर डकेट याने धुवांधार फलंदाजी करत 118 चेंडूत नाबाद 133 धावा केल्या. रूट 12 धावांवर खेळत आहे.

'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी
'बाळासाहेबांना भारतरत्न द्या', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची मागणी.
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'
नितेश राणेंची सैफच्या हल्ल्यावर शंका, 'मला संशय, खरंच चाकू मारला की..'.
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?
ट्रम्पच्या नव्या धोरणामुळे अमेरिकेतील 20 हजार भारतीय मायदेशी परतणार?.
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता
वाल्मिक कराडला आर्थर जेलमध्ये ठेवा, दमानियांची मागणी, तर जरांगे म्हणता.
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'
Saif Ali Khan Attacked : 'सैफवर जीवघेणा हल्ला तर 'तो' इतका फिट कसा?'.