AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

… तर आरसीबीला अंतिम फेरीत जिंकणं कठीण होईल! आर अश्विनने दिला थेट इशारा

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत आरसीबीने धडक मारली आहे. नऊ वर्षानंतर आरसीबीने अंतिम फेरी गाठली आहे. आता जेतेपदापासून एक विजय दूर आहे. असं असताना आर अश्विनने जेतेपदाबाबत भाकीत वर्तवल्याने धाकधूक वाढली आहे.

... तर आरसीबीला अंतिम फेरीत जिंकणं कठीण होईल! आर अश्विनने दिला थेट इशारा
आरसीबी आणि आर अश्विनImage Credit source: TV9 Network/Telugu
| Updated on: May 30, 2025 | 2:45 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर फेरीत पंजाब किंग्सचा 8 विकेटने धुव्वा उडवला आहे आणि आरसीबीने अंतिम फेरी गाठली. आयपीएल इतिहासात आरसीबीने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण आरसीबीला एकदाही जेतेपदाची चव चाखता आली नाही. मागच्या 17 पर्वात आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. आता पुन्हा एकदा हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आरसीबीकडे चालून आली आहे. जेतेपदापासून एक विजय दूर आहे. पण अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी कोण असेल? याचं गणित अजून ठरलेलं नाही. यासाठी दोन सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जशी सामना करेल. जिंकणारा संघ अंतिम फेरीत खेळेल. पण आर अश्विनने अंतिम फेरीपूर्वीच आरसीबी चाहत्यांच्या पोटात गोळा आणला आहे. त्याने वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं तर पुन्हा एकदा पदरी निराशा पडेल.

आर अश्विन भाकीत वर्तवताना म्हणाला की, फक्त पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात आरसीबीला हरवू शकेल. या हंगामात लीग टप्प्यात आरसीबी आणि मुंबई इंडियन्स फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. त्यात आरसीबीने वानखेडे स्टेडियमवरील सामना जिंकला होता. पण अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी दोन हात करणं म्हणजे खूपच कठीण होईल असं आर अश्विन म्हणाला. आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर गुजरात टायटन्सने एलिमिनेटर फेरीतच मुंबईला पराभूत करावं अशी इच्छा आरसीबीच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

यूट्यूब चॅनलवर आर अश्विनने सांगितलं की, “जर आरसीबीला आयपीएल जिंकायचे असेल तर गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकावे लागेल. मुंबई इंडियन्स हा असा संघ आहे ज्याला तुम्ही अंतिम फेरीत प्रवेश देऊ शकत नाही. तुम्हाला त्यांना कोणत्याही किंमतीत रोखावे लागेल. मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे ज्याला आरसीबीविरुद्ध काही संधी आहे. जर मी आरसीबी असतो तर मला गुजरात टायटन्सचा सामना करायला आवडेल.”

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.