Video : क्या कॅच था! राधा यादवचा फ्लाइंग कॅच, व्हिडीओ व्हायरल, पाहा खास क्षण

शेवटच्या षटकात राधा यादवने घेतलेल्या अप्रतिम झेलने डंकलेचा डाव संपुष्टात आला.

Video : क्या कॅच था! राधा यादवचा फ्लाइंग कॅच, व्हिडीओ व्हायरल, पाहा खास क्षण
राधा यादवचा फ्लाइंग कॅचImage Credit source: social
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 2:08 PM

मुंबई : महिला टी 20मध्ये (women’s t20 challenge) सध्या चांगलीच रंगत येत आहे. आयपीएलबरोबरच महिला टी 20 देखील क्रिकेटप्रेमींसाठी रंजक ठरत आहे.  महिला T20 चॅलेंजच्या तिसऱ्या सामन्यात दीप्ती शर्माच्या (Dipti Sharma) नेतृत्वाखालील संघ आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांच्या ट्रेलब्लेझर्स (VEL vs TBL) यांच्यात अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी चुरशीची लढत झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर दीप्ती शर्माने ट्रेलब्लेझर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. स्मृती संघाने सबिनेनी मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्सच्या अर्धशतकांच्या जोरावर 190 धावा केल्या . यादरम्यान डंकलेने फटाक्यांची खेळी खेळूनही योगदान दिले. अधिक नुकसान पोहोचवण्यापूर्वीच राधा यादवने (Radha Yadav) जबरदस्त झेल घेत त्याचा डाव संपवला.

हे सुद्धा वाचा

Velocity vs Trailblazers (VEL vs TBL) सामन्यात महिला क्रिकेटचा स्तर उंचावल्याचे दिसून आले आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा प्रत्येक आघाडीवर महिला क्रिकेटपटू जीवाचे रान करताना दिसतात. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ट्रेलब्लेझर्सने महिला टी-20 चॅलेंजमध्ये सर्वाधिक 190 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये सॅबिनीन मेघना आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी चांगली फलंदाजी केली आहे. शेवटी डंकले आला आणि त्याने चांगलेच हात उघडले आणि अवघ्या 8 चेंडूत 19 धावा केल्या.

अप्रतिम झेलने डंकलेचा डाव संपुष्टात

शेवटच्या षटकात राधा यादवने घेतलेल्या अप्रतिम झेलने डंकलेचा डाव संपुष्टात आला. डंकलेने शेवटच्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर 2 चौकार मारले होते. यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेतल्या आणि चौथ्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात लाँग ऑफच्या दिशेने एक शॉट खेळला.

क्या कॅच था!

पण चेंडू आणि बॅटचा संपर्क चांगला नव्हता. त्यामुळे चेंडू सीमारेषेबाहेर जाऊ शकला नाही. यावेळी लाँग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षण करणाऱ्या राधा यादवने चटकन चेंडूकडे धाव घेतली आणि डायव्ह मारत झेल पूर्ण केला.

किरण नवगिरेच्या अर्धशतकी

किरण नवगिरे हिच्या अर्धशतकी खेळीमुळे पुढील दोन षटकांत दोन गडी बाद झाले. चौथ्या षटकात यास्तिका भाटिया (19 धावा, तीन चौकार) आणि पाचव्या षटकात शेफाली वर्मा (15 चेंडू, पाच चौकार) यांची विकेट गमावली. व्हेलॉसिटीची धावसंख्या पाच षटकांत दोन बाद 50 अशी होती. किरण नवगिरेनं सहाव्या षटकात सलमा खातूनच्या चेंडूवर दोन षटकार आणि एका चौकारासह 18 धावा संघाच्या खात्यात जमा केल्या. व्हेलॉसिटीने 10 षटकांत 2 बाद 105 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना 60 चेंडूत 86 धावा करायच्या होत्या. त्यानंतर पूनम रावतनं लॉरा वोलवॉर्टला (17) यष्टिरक्षकाकडून झेलबाद करून संघाची तिसरी विकेट मिळवली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.