WTC Final च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, वरुणराजने घोळ घातला तर मॅचचं काय होणार? वाचा…

संपूर्ण क्रिकेट जगत वाट पाहत असलेल्या भारत (India) आणि न्‍यूझीलंड ( New Zealand) सामन्याबाबत समोर आलेली ही बातमी सर्व क्रिकेट रसिकांच मन तोडणारी आहे.

WTC Final च्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट, वरुणराजने घोळ घातला तर मॅचचं काय होणार? वाचा...
southampton weather
Follow us
| Updated on: Jun 17, 2021 | 3:35 PM

Southampton Weather Forecast June 18 : भारत आणि न्‍यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्‍ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship Final) अंतिम सामना उद्या म्हणजेच 18 जूनपासून इंग्लंडच्या साऊदम्प्टनमधील (Southampton) रोज बाउल स्‍टेडियमवर खेळवला जाणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच एक वाईट बातमी समोर आली आहे. सामना असलेल्या साऊदम्प्टनमध्ये पुढील काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागानं (Southampton Weather Forecast) वर्तविल्याने सामन्यावर पावसाचे सावट आले आहे. (Rain may Spoil India vs New Zealand World test Championship Final in Southampton Know Weather Update in ICC WTC Final 2021)

पूर्वीपासूनच इंग्लंडमध्ये सामना म्हणजे हवामानाची भूमिका महत्त्वाची असते. कारण इंग्लंडमधील वातावरण कधीही बदलतं. त्यातच भारत आणि न्‍यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना इंग्लंडमध्येच असल्याने या सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. साऊदप्टनच्या हवामान विभागानं वर्तवलेल्यचा अंदाजानुसार 18 जून रोजी पावसाचे हवामान असून तापमानही 17 डिग्री अंश सेल्सियस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसभर हलक्या किंवा मुसळधार पावसाची शक्यता असल्याने संपूर्ण 90 ओव्हरचा खेळ होण्याची शक्यता कमी आहे.

southampton-weather

southampton-weather

…तर संयुक्‍त विजेता घोषित करण्यात येईल

हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज केवळ 18 जून पुरताच नसून 19,20 आणि 22 जून रोजीही पावसाचे संकट असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केवळ 21 जूनलाच पाऊस नसण्याची शक्यता असल्याने जर पावसामुळे सामना होऊ शकला नाही, तर दोन्ही संघाना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. आयसीसीच्या नियमांमध्ये अशी तरतूद असून सामना न झाल्यास किंवा अखेरपर्यंत ड्रॉ च राहिल्यास दोन्ही संघाना संयुक्त विजेता घोषित केलं जाऊ शकतं.

हे ही वाचा :

WTC अंतिम सामन्यात कोण जिंकणार?, युवराज सिंगने सांगितलं विजेत्या संघाचं नाव

भारतीय संघाजवळ कुठेही जाऊन कुणालाही पाणी पाजायची ताकद : गौतम गंभीर

WTC Final : भारत की न्यूझीलंड, कोण जिंकणार? जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनने वर्तवला ‘हा’ अंदाज

(Rain may Spoil India vs New Zealand World test Championship Final in Southampton Know Weather Update in ICC WTC Final 2021)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.