IND vs SL: टीम इंडियाचं गणित दुसऱ्या दिवशी फसलं! जर तसं झालं तर…

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसावर भारताने मजबूत पकड मिळवली होती. पण दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं नशिब फुटकं निघालं.

IND vs SL: टीम इंडियाचं गणित दुसऱ्या दिवशी फसलं! जर तसं झालं तर...
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 16, 2026 | 1:44 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू असून दुसऱ्या दिवशी खेळ खंडोबा झाला. पहिल्या दिवशी 73 षटकांचा खेळ झाला होता. तेव्हा भारताने 2 गडी गमवून 288 धावा केल्या होत्या. देवदत्त पडिक्कल चांगल्या फॉर्मात होता आणि नाबाद 131 धावांची खेळी होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण दुसऱ्या लंच ब्रेकपर्यंत एकही चेंडू टाकला गेला नाही. पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे सामना सुरू होईल की नाही याबाबत साशंकता होती. त्यात पहिल्या सत्रातील दोन सेशन वाया गेल्याने टीम इंडियाचं गणित फसलं आहे. आता उर्वरित तीन दिवसात खूप वेगाने खेळ पुढे सरकरणं गरजेचं आहे.

टीम इंडियाचं पुढे कसं काय?

पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान आता टीम इंडियासमोर असणार आहे. कारण गॉल कसोटी सामन्यात आतापर्यंत पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारणाऱ्या संघाला विजयाचं संधी अधिक असते. तसं पाहिलं तर भारताकडे मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आहे. पण पावसाच्या व्यत्ययामुळे संपूर्ण ताल बिघडला आहे. आता भारताला विकेट वाचवून थोडा आक्रमक खेळ खेळावा लागणार आहे. तसेच श्रीलंकेचे विकेट झटपट बाद करावे लागणार आहेत. मोठी धावसंख्या उभारली तर फॉलोऑन देऊन सामना फिरवता येईल. अन्यथा हा सामना ड्रॉ होईल आणि भारताचं पुढचं गणित बिघडेल. त्यात पावसानंतर खेळपट्टी कशी असेल याबाबतही शंका आहे. फिरकीची जादू चालेल का? असाही प्रश्न आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेचं गणित काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीच्या दृष्टीने उर्वरित नऊ पैकी 7 सामने जिंकणं भाग आहे. त्यात ए सामना बरोबरीत सोडवावा लागणार आहे. तर आणि तरच अंतिम फेरीचं गणित सुटू शकते. त्यामुळे श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. असं असताना पहिल्याच सामन्यात गणित बिघडलं आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यात चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us