IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला झटका, धोनीचा अपमान करणारा खतरनाक खेळाडू खेळणार नाही!

राज जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान सुरुवातीचा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाहीय. Rajasthan Royals Mustfijur rehman

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला झटका, धोनीचा अपमान करणारा खतरनाक खेळाडू खेळणार नाही!
Mustafijur rehman
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 2:52 PM

मुंबईआयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम सुरु व्हायला अगदी काही दिवस राहिले आहेत. 9 एप्रिलला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers banglore) यांच्यात आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला सामना पार पडतोय. सगळे संघ अंतिम तयारीला लागले आहेत. अशातच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला टूर्नामेंट सुरु होण्याअगोदरच मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा आक्रमक गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) राजस्थानच्या सुरुवातीलाच्या काही मॅचेस खेळू शकणार नाही. आता बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान (Mustfijur Rahman) सुरुवातीचा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळू शकणार नाहीय. (Rajasthan Royals Mustfijur rehman Miss Punjab Kings opening Match of IPL 2021)

राजस्थान रॉयल्स 12 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएलचा पहिला सामना खेळणार आहे.परंतु नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यावर बांगलादेशच्या टी -20 संघात सहभागी असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान 4 एप्रिलला बांगलादेशात परत येईल. जरी तो दुसर्‍याच दिवशी भारतात आला, तरी त्याला किमान 7 दिवस तरी क्वारन्टाईन राहवं लागेल. तरच तो राजस्थान रॉयल्सच्या उर्वरित खेळाडूंमध्ये सहभागी होऊ शकेल.

अशातच आता समोर आलेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्स संघाला जोफ्रा आर्चर आणि मुस्तफिजूर रहमानशिवाय पंजाब किंग्जविरुद्धची पहिली लढत खेळावी लागणार आहे.

दुसऱ्या सामन्यातही मुस्तफिजूर बाहेर?

राजस्थान रॉयल्सचा दुसरा सामना 15 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. क्वारन्टाईनच्या कारणास्तव या सामन्यातही मुस्तफिजूर रहमान खेळू शकत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

राजस्थानने रहमानला 1 कोटी रुपये बेस प्राइसवर खरेदी केलं आहे. मुस्तफिजूरने 2016 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलंय. त्यानंतर या लीगमधील 24 सामन्यांत त्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही 16 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद अशी आहे. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 7.51 होता.

धोनीसह दिग्गजांचा अपमान करुन चर्चेत

मुस्तफिजुर रहमान महेंद्रसिंग धोनीसह (MS Dhoni) टीम इंडियाच्या अनेक दिग्गज खेळाडूंचा अपमान करुन चर्चेत आला होता. 2015 मध्ये एक जाहिरात झाली होती, ज्यामध्ये मुस्तफिजुर रहमान कटरचं प्रमोशन करताना दिसला. या जाहिरातीमध्ये धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांचं अर्ध धड दाखवण्यात आलं होतं. यावेळी मुस्तफिजूरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

(Rajasthan Royals Mustfijur rehman Miss Punjab Kings opening Match of IPL 2021)

हे ही वाचा :

IPL 2021 : बंदे में दम हैं… एकमेव खेळाडू, एका IPL हंगामात 300 पेक्षा अधिक रन्स आणि हॅट्रिकचा कारनामा!

MS धोनीचा करेक्ट कार्यक्रम, कोच स्टीफन फ्लेमिंग यांचा बर्थडे सहकाऱ्यांबरोबर खास अंदाजात सेलिब्रेट!

IPL 2021 : कोरोनाने सीमारेषा ओलांडली, वानखेडे स्टेडियमच्या 8 कर्मचाऱ्यांना लागण

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.