AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : बाबो, टकुरं फुटता फुटता वाचलं की हो, वैभव सूर्यवंशींच्या शॉटची तुफान चर्चा, असे थोडक्यात वाचले 4 जण

Vaibhav Suryavanshi big shot : Team India चा 19 वर्षांखालील संघाचा दमदार खेळाडू वैभव सूर्यवंशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सध्या जमके सराव करत आहे. यादरम्यान त्याने मारलेला एक शॉट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. का होत आहे या शॉटची चर्चा?

Video : बाबो, टकुरं फुटता फुटता वाचलं की हो, वैभव सूर्यवंशींच्या शॉटची तुफान चर्चा, असे थोडक्यात वाचले 4 जण
वैभव सूर्यवंशीने हिला डाला
| Updated on: Aug 09, 2025 | 2:00 PM
Share

इंग्लंड दौऱ्यात आपल्या तळपत्या बॅटने प्रतिस्पर्धी गोलंदाजाला वैभव सूर्यवंशीने पाणी पाजले. 14 वर्षीय वैभव आता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय 19 वर्षांखालील क्रिकेट संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी संघ कांगारू संघासोबत 3 एकदिवसीय सामने आणि दोन 4 दिवसीय कसोटी सामने खेळणार आहे. 21 सप्टेंबर रोजी दोन्ही संघ भिडतील. या दौऱ्यासाठी वैभव सूर्यवंशी जमके सराव करत आहेत. या सरावाचा एक खास व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात वैभवच्या एका शॉटवर 4 लोक आपलं डोकं वाचवण्यासाठी खाली झोपताना दिसतात.

चार लोक थोडक्यात बचावले

आयुष्य म्हात्रे याच्या नेतृत्वात भारताचा 19 वर्षांखालील संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आहे. 21 सप्टेंबर रोजी दोन्ही देशात सामने सुरू होतील. त्यासाठी वैभव सूर्यवंशी हा जोरदार सराव करत आहे. दरम्यान राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ समाज माध्यमावर शेअर केला आहे. त्यात तो एकदम फटकेबाजी करताना दिसतो. त्याने इतका जोरात फटका मारला की, तिथे उपस्थित चार लोक थेट जमिनीवर झोपले. वैभव सूर्यवंशीने एका प्रमोशनल शूट दरम्यान हा शॉट खेळला. त्यावेळी चेंडूचा मार बसू नये म्हणून कॅमेरामन आणि शूटिंग क्रूमधील अनेक सदस्य थेट जमिनीवर लोळले.

काय आहे त्या व्हिडिओत?

वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्ससाठी एक प्रमोशनल शूट करायचे होते. त्यासाठी तो फटकेबाजी करत होता. त्याच्या हेल्मेटवर एक गोप्रो कॅमेरा लावण्यात आला होता. नॉन-स्ट्रायकर एंडवर उपस्थित असलेले क्रू मेंबर्स विविध अँगलमधून त्याची फलंदाजी रेकॉर्ड करत होते. एका गोलंदाजाने वैभव सूर्यवंशीला चेंडू टाकताच मग त्याने तो जोरदारपणे फटकावले. त्याने इतक्या वेगात चेंडू फटकावला की तो एखाद्या बंदुकीतील गोळीप्रमाणे आला. त्यामुळे क्रू मेंबर्सची भांबेरी उडाली. आता डोकं तरी शाबूत राहावं म्हणून ते सरळ जमिनीवर झोपले.

या व्हिडिओत आपली चूक लक्षात येताच मग वैभवने निरागस चेहरा केला आणि सॉरी..सॉरी म्हणत सर्वांची माफी मागितली. या व्हिडिओवर कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे.  सध्या वैभव सूर्यवंशी जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्याकडून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कमाल कामगिरीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.