AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : स्पर्धेतील वैयक्तिक धावसंख्येबाबत विचारताच अजिंक्य रहाणेनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला…

अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदाखाली मुंबईने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात विदर्भाला पराभूत करत 42 व्यांदा रणजी चषक आपल्या नावावर केला. या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेला कुठे सूर गवसला. मात्र संपूर्ण स्पर्धेत त्याची बॅट शांत होती. याबाबत अजिंक्य राहणेला विचारताच कसलीही तमा बाळगता सडेतोड उत्तर दिलं.

Ranji Trophy : स्पर्धेतील वैयक्तिक धावसंख्येबाबत विचारताच अजिंक्य रहाणेनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला...
| Updated on: Mar 14, 2024 | 3:03 PM
Share

मुंबई : रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईने विदर्भाला 169 धावांनी पराभूत केलं. या विजयासह मुंबईने रणजी ट्रॉफीच्या जेतेपदावर 42व्यांदा नाव कोरलं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबई या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. मात्र अजिंक्य रहाणेचा फॉर्म काही दिसला नाही. संपूर्ण स्पर्धेत बहुतांशवेळा एकेरी धावसंख्येवर अजिंक्य रहाणे तंबूत परतला. त्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. इतकंच काय तर पुढच्या वेळेस मुंबई संघात स्थान मिळेल की नाही यावर चर्चा सुरु झाली आहे. अंतिम सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे 35 चेंडूंचा सामना करून 7 धावा करून तंबूत परतला. हर्ष दुबेने त्याला ध्रुव शोरेच्या हाती झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेनं सावध फलंदाजी केली. तसेच मुशीरसोबत निर्णायक भागीदारी करून मुंबईला मोठी धावसंख्या उभारून देण्यास मदत केली. अजिंक्य रहाणेनं 143 चेंडूत 73 धावांची खेळी केली. यात 5 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

“क्रिकेट कारकिर्दित चढउतार हे येत असतात. हा एक खेळाचा भाग आहे. मी स्वत:बाबत असा कधीच विचार करत नाही. कायम संघाचा विचार करत आलो आहे. मला वैयक्तिक धावसंख्येपेक्षा आम्ही यावर्षी जेतेपदावर नाव कोरलं याचा आनंद आहे. प्रत्येक खेळाडूला या वेळेतून जावं लागतं. आज आम्ही विजयाचा आनंद साजरा करणार आहोत. इतकी मेहनत घेऊन आम्ही जिंकलो आहोत.”, असं मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने विजयानंतर सांगितलं. गेल्या वर्षी एका धावेने मुंबईचं स्वप्न भंगलं होतं, त्यावरही अजिंक्य रहाणेनं आपलं मत व्यक्त केले. ‘आजचा विजय खूपच आनंददायी आहे. गेल्या वर्षी आम्ही एका धावेने अपात्र ठरलो होतो. हा पराभव जिव्हारी लागला होता.’

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबई (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (डब्ल्यू), शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे.

विदर्भ (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, अक्षय वाडकर (विकेटकीपर/कर्णदार), आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकूर, आदित्य ठाकरे.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.