AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy : वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पहिल्याच सामन्यात दमदार विजय, एक डाव आणि 165 धावांनी नमवलं

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बिहारने मोठा विजय मिळवला. अरूणाचल प्रदेशचा बिहारसमोर निभाव लागला नाही. हा सामना बिहारने एक डाव आणि 165 धावांनी जिंकला. पण या सामन्यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशी काही खास करू शकला नाही.

Ranji Trophy : वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पहिल्याच सामन्यात दमदार विजय, एक डाव आणि 165 धावांनी नमवलं
Ranji Trophy : वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पहिल्याच सामन्यात दमदार विजय, एक डाव आणि 165 धावांनी नमवलंImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 17, 2025 | 6:18 PM
Share

रणजी ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बिहार आणि अरुणाचल प्रदेश हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा अरूणाचल प्रदेशच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली. अरूणाचल प्रदेशने पहिल्या डावात 10 गडी गमवून 105 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्याच डावात बिहारने मोठी आघाडी घेतली. बिहारने 116.3 षटकात 9 गडी गमवून 542 धावांचा डोंगर रचला आणि डाव घोषित केला. पहिल्याच डावात बिहारकडे 437 धावांची आघाडी होती. या डावात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा होत्या. मात्र फार काही खास करू शकला नाही. त्याने 5 चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि 1 षटकार मारून 14 धावांवर बाद झाला.

बिहारकडून आयुष लोहोरुकाने एका बाजूने अरूणाचल प्रदेशाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं. त्याने 247 चेंडूंचा सामना करत 37 चौकार आणि 1 षटकार मारत 226 धावा केल्या. अमाव किशोरने 52, कर्णधार गनीने 59, बिपिन सौरभने 52 आणि सचिन कुमारने 75 धावांची खेली केली. त्यांच्या खेळीमुळे बिहारने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. अरुणाचल प्रदेशचा संघ 437 धावांची आघाडी मोडून काढतानाच संपला. दुसऱ्या डावात कशी बशी 272 धावांपर्यंत मजल मारली. पण आघाडी काही मोडता आली नाही. तेची नेरीने 128 धावांची खेळी केली. पण त्याला इतरांची काही साथ लाभली नाही. संपूर्ण 272 धावांवर तंबूत परतला. बिहारने या सामन्यात एक डाव आणि 160 धावांनी विजय मिळवला.

बिहारचा साकीब हुसेन हा अरुणाचल प्रदेशवर भारी पडला. त्याने पहिल्या डावात 11.3 षचटकात 41 धावा देत 6 गडी बाद केले होते. तर दुसऱ्या डावात 16 षटकात 58 धावा देत 4 गडी बाद केले. हिमांशु सिंहने दुसऱ्या डावात 3 गडी बाद केले. तर सचिन कुमारने 2 गडी तंबूत पाठवले. या सामन्यात उपकर्णधार वैभव सूर्यवंशीकडून क्रीडाप्रेमींना अपेक्षा होत्या. मात्र अपेक्षाभंग झाला. आता पुढच्या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

अरुणाचल प्रदेश (प्लेइंग इलेव्हन): नीलम ओबी (कर्णधार), जैनाथ मानसिंग, कमशा यांगफो (विकेटकीपर), तेची डोरिया, अभिनव सिंग, सिद्धार्थ बलोदी, तेची नेरी, लिमार दाबी, तडाकमल्ला मोहित, नबाम डोल, याब निया निया

बिहार (प्लेइंग इलेव्हन): साकिबुल गनी (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, बिपिन सौरभ (विकेटकीपर), अर्णव किशोर, आयुष लोहारुका, रघुवेंद्र प्रताप सिंग, आमोद यादव, सचिन कुमार, हिमांशू सिंग, नवाज खान, साकिब हुसेन

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.