AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजिंक्य रहाणेचं नशिब म्हणावं की आणखी काय? चौकारच होता पण…, पाहा Video

रणजी स्पर्धेत सर्वाधिक दिग्गज खेळाडूंचा भरणा मुंबईच्या संघात आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात रोहित शर्मा, जयस्वाल, दुबे आणि शार्दुल ठाकुरसारखे दिग्गज खेळाडू आहेत. असं असताना टीमला वाईट स्थितीतून काढण्यात अजिंक्य रहाणेला अपयश आलं. दुसरीकडे लॉर्ड शार्दुलने शतकी खेळी करत लाज राखली.

अजिंक्य रहाणेचं नशिब म्हणावं की आणखी काय? चौकारच होता पण..., पाहा Video
| Updated on: Jan 24, 2025 | 5:04 PM
Share

अजिंक्य रहाणे हे भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये नशिब आजमावत आहे. मात्र त्यातही त्याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. इतकंच काय तर त्याला नशिबाची साथ मिळत नाही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मुंबई संघाची 86 वर 5 विकेट अशी स्थिती होती. पहिल्या डावात जम्मू काश्मीरने घेतलेली आघाडी मोडून काढली होती. पण पुढे मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान होतं. अशा स्थितीत कर्णधार अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या. त्याने यासाठी कंबरही कसली होती. अजिंक्य रहाणने नाबाद 16 धावांवर खेळत होता. उमर नझीरच्या गोलंदाजीचा सामना करत होता. उमरने ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथ चेंडू टाकला. रहाणेने मिड ऑफ आणि कव्हरच्या मधून जबरदस्त फटका मारला. जवळपास हा चेंडू चौकार होता असंच म्हणावं लागेल. पण येथे अजिंक्य रहाणेचं नशिब आडवं आलं.

मिड ऑफ उभ्या असलेल्या डोगराने डाव्या बाजूला धावला आणि उडी घेतली. तसेच डाव्या हातात अजिंक्य रहाणेचा अप्रतिम झेल पकडला. डोगराने चौकार तर वाचवला वरून अजिंक्य रहाणेला तंबूत जाण्यास भाग पाडलं. त्यामुळे मुंबईला 91 धावांवर 6 विकेट अशी स्थिती आली. त्यानंतर शम्स मुलानीही काही खास करू शकला नाही आणि 4 धावा करून बाद झाला. त्यामुळे 101 धावांवर 7 विकेट अशी स्थिती आली.

मुंबईची लाज वाचवण्यात आठव्या आणि नवव्या स्थानावर खेळत असलेल्या खेळाडूंना यश आलं. दोघांनी दुसऱ्या दिवशी 150 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसेच मुंबईला संकटातून बाहेर काढलं. शार्दुल ठाकुरने शतक, तर तनुष कोटियनने अर्धशतक ठोकलं. मुंबईचा संघ पहिल्या डावात 120 धावांवर बाद झाला होता. तर जम्मू काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा करत 86 धावांची आघाडी घेतली होती. 2014 मध्ये जम्मू काश्मीरने मुंबईला पराभूत केलं होतं.

चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक
चौकशीला विलंब नको; अजित पवार विमान प्रकरणी आव्हाड आक्रमक.
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत...
अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांना नवी शंका, चौकशीबाबत....
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा
राज्यसभेच्या दोन्ही जागांवर आमचाच हक्क आदित्य ठाकरेंचा दावा.
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप
अंबादास दानवे यांचा 1,150 कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप.
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार
पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी तौबा गर्दी! काय आहे प्रकार.
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका
विरोधी पक्षनेता नसलेले पहिले अधिवेशन! आदित्य ठाकरे यांची टीका.
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?
पार्थ पवार, आठवले आणि शेवाळे राज्यसभेवर जाणार? पडद्यामागे काय ठरलं?.
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन
सोमय्यांना कडाडून विरोध, थेट महापौर आणि उपमहापौरांचंच ठिय्या आंदोलन.
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह
शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम देतात! विक्रम काळेंकडून प्रश्नचिन्ह.
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
... तर तो फ्रॉड कॉल आहे असं समजा! मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.