Ajinkya Rahane : शांत, संयमी अजिंक्य संतापला;अंपायरसह भिडला, काय झालं?
Ajinkya Rahane Unhappy On Umpire Decision : मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मिरविरुद्धच्या सामन्यात काहीसा संतापलेला दिसला. जाणून घ्या नक्की काय झालं?

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील 2024-2025 या हंगामातील दुसऱ्या टप्प्याला 23 जानेवारीपासून सुरुवात झाली. मुंबई टीम या स्पर्धेत अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात जम्मू काश्मीर विरुद्ध खेळत आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे कायमच मैदानात शांत आणि संयमी असतो. मात्र क्रिकेट चाहत्यांना 24 जानेवारीला साम्यातील दुसऱ्या दिवशी वेगळं चित्र पाहायला मिळालं. अंपायरच्या निर्णायवरुन कॅप्टन रहाणेना नाराजी व्यक्त केली. अंपायरचा निर्णय रहाणेला पटला नाही. रहाणेने याबाबत गप्प न राहता आपली भावना व्यक्त केली आणि अंपायरला जाब विचारला. या सर्व प्रकाराची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. नक्की काय झालं? हे सविस्तर जाणून घेऊयात.
नक्की काय झालं?
मुंबई संघातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये टीम इंडियासाठी खेळणाऱ्या एकूण 6 खेळाडूंचा समावेश आहे. रोहित शर्मा या यशस्वी जयस्वाल दोघांनी अनेक महिन्यांनी मुंबई टीममध्ये कमबॅक केलं. या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र या दोघांनी दोन्ही डावात निराशा केली. तसेच शिवम दुबे, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर अनुभवी फलंदाजांनी निराशा केली. आधीच मुंबईची घसरगुंडी झालेली असताना अंपायरने श्रेयसला आऊट दिलं. त्यावरुन रहाणेने आक्षेप घेतला.
रोहित आणि यशस्वी या सलामी जोडीने टीम इंडियाला आश्वासक सुरुवात करुन दिली. यशस्वी आणि रोहितने 54 धावांची सलामी भागीदारी केली. मात्र त्यांनतर टीम इंडियाचा डाव गडगडला. जेकेने मुंबईला ठराविक अंतराने झटके दिले. श्रेयस अय्यर पाचव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. श्रेयसला डावातील 19 व्या ओव्हरमध्ये अंपायरमुळे जीवनदान मिळालं. श्रेयसने 19 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याच्या प्रयत्न केला. मात्र या दरम्यान बॉल बॅटचा कट घेऊन विकेटकीपरच्या दिशेने गेला. मात्र अंपायरने नॉट आऊट दिलं. त्यामुळे श्रेयस वाचला.
अजिंक्य रहाणे नाराज
Ajinkya Rahane was not happy with the umpire’s decision 😮❌
He thought it wasn’t a clean catch by the keeper but Shreyas Iyer was given out. ☝️#RanjiTrophy pic.twitter.com/zpCGmd6vWk
— CricXtasy (@CricXtasy) January 24, 2025
श्रेयसला या जीवनदानाचा फार फायदा घेता आला नाही. श्रेयस 22 व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. अय्यरने 16 बॉलमध्ये 4 चौकारांसह 17 दावा केल्या. श्रेयस अय्यर कॅच आऊट झाला. मात्र श्रेयससोबत नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या अजिंक्यला हा निर्णय पटला नाही. त्यामुळे अजिंक्यने पंचांना धारेवर धरत जाब विचारला.
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि कर्ष कोठारी.
जम्मू-काश्मीर प्लेइंग ईलेव्हन : पारस डोगरा (कॅप्टन), शुभम खजूरिया, विवरांत शर्मा, अब्दुल समद, कन्हय्या वधावन (विकेटकीपर), औकिब नबी डार, यावर हसन, युद्धवीर सिंह चरक, आबिद मुश्ताक, उमर नझीर मीर आणि वंशज शर्मा.