मुंबई : टी-20 विश्वचषक संपल्यावर भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात येणार आहे. शास्त्री यांच्यानंतर माजी क्रिकेटपटू राहूल द्रवीड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर रवी शास्त्री नेमकं काय करणार ? कोणती भूमिका स्वीकारणार हा प्रश्न सर्वांनाच पडलाय. दरम्यान, अलीकडेच नव्याने आलेला अहमदाबाद हा आयपीएलचा संघ शास्त्री यांना मुख्य कोच म्हणून नियुक्त करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाला फलंदाजीचे प्रशिक्षण देणारे भरत अरुण तसेच गोलंदाजीचे प्रशिक्षण देणारे श्रीधर हेसुद्धा अहमदाबाद संघाशी जोडले जाण्याची शक्यता व्यक्त केली केली जातेय.