ILT20 लिलावात अनसोल्ड! रविचंद्रन अश्विन वैतागला, खास व्हिडीओ केला डिलिट?
रविचंद्रन अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. असं असताना ILT20 लिलावात त्याला कोणी भाव दिला नाही. त्यामुळे आता आर अश्विनने स्पष्टीकरण दिलं आहे.

आर अश्विनने स्वत:च्या कामगिरीच्या जोरावर अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलला रामराम ठोकला आहे. तर जगभरातील विविध टी20 लीगमध्ये खेळण्याची तयारी दाखवली आहे. त्याने नुकताच बिग बॅश लीग स्पर्धेत खेळण्यासाठी करार केला आहे. तसेच युएईच्या ILT20 लीगकडे लक्ष होते. आयएलटी20 लिलावातही खेळण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी त्याने सर्वोच्च आधारभूत किंमत 120000 डॉलर निश्चित केली होती. 1 ऑक्टोबर 2025 रोजी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात सहा फ्रेंचायझी होत्या आणि एकानेही त्याला घेण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे त्याच्या पदरी तिथे निराशा पडली. त्याला लिलावात कोणीच भाव दिला नाही. या प्रकारामुळे आर अश्विन वैतागल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. कारण त्याने या लीगशी संदर्भात एक व्हिडीओ युट्यूब चॅनेलवरून काढून टाकला आहे.
आयएलटी20 लिलावात सर्वाधिक बेस प्राइस असलेल्या आर अश्विनसाठी कोणीच बोली लावली नही. खरं तर आयपीएल पहिल्या फेरीत कोणी भाव दिला नाही तर पुन्हा लिलावात उतरवलं जातं. पण आर अश्विनचं नाव नसल्याने आश्चर्य वाटलं. लिलावाच्या प्रसारणात सहभागी असलेले सायमन डौल यांनी अश्विनने आपले नाव मागे घेतल्याची घोषणा केली. कदाचित अश्विनला या अपमानामुळे वाईट वाटले असेल आणि त्याने त्याचे नाव मागे घेतले असेल, अशी चर्चा रंगली आहे. रिपोर्टनुसार, लिलावाच्या काही तास आधी अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पण लिलाव संपल्यानंतर त्याने हा व्हिडिओ त्याच्या चॅनेलवरून हटवला किंवा प्रायव्हेट केला असावा. यामुळे आणखी संभ्रम वाढला.
लिलावाच्या एक दिवसानंतर अश्विनने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्याने सांगितलं की बिग बॅश लीग खेळण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच या लिलावातून माघार घेणार होता. पण आयएलटीला दिलेल्या शब्दामुळे लिलावात भाग घेण्याची तयारी दाखवली. बीबीएल आणि आयएलटी20 लीग एकाच वेळी होणार असल्याने अश्विनने यापूर्वी सिडनी थंडरशी फक्त काही सामन्यांसाठी करार केला होता. पण आता संपूर्ण बीबीएल हंगामासाठी उपलब्ध असणार आहे.
