AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अनिल कुंबळेच्या नावावर आश्चर्यकारक विक्रम, अंतिम फेरीत झालं असं की..

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेले आहेत. काही विक्रम आश्चर्यकारकही आहेत. त्याची चर्चा आजही होत आहे. आयपीएल स्पर्धेत असाच एक विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अनिल कुंबळेच्या नावावर आश्चर्यकारक विक्रम, अंतिम फेरीत झालं असं की..
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अनिल कुंबळेच्या नावावर आश्चर्यकारक विक्रम, अंतिम फेरीत झालं असं की..Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 24, 2026 | 7:05 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. असं असताना या स्पर्धेची रंगत वाढत जाणार यात काही शंका नाही. दुसरीकडे, या स्पर्धेतील काही आश्चर्यकारक विक्रमांची चर्चाही रंगली आहे. असाच एक विक्रम माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेच्या नावावर रचला गेला आहे. अनिल कुंबळे आयपीएल इतिहासातील एकमेव खेळाडू असा आहे की, अंतिम फेरीत गमावल्यानंतरही प्लेयर ऑफ द मॅचा मानकरी ठछरला आहे. अनिल कुंबळे 2009 मध्ये आरसीबीचा कर्णधार होता आणि डेक्कन चार्जर्स विरूद्ध अंतिम फेरीची लढत झाली होती. या सामन्यात आरसीबीचा फक्त 6 धावांनी पराभव झाला होता. पण असं असूनही अनिल कुंबळे प्लेयर ऑफ द मॅच ठरला होता. कारण की त्याने 4 षटकात 16 धावा देत 4 गडी बाद केले होते.

आयपीएल 2009 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेक्कन चार्जर्सने 20 षटकात 143 धावा केल्या होत्या. या सामन्यात हर्शल गिब्सने नाबाद 53 धावांची खेळी केली होती. तर सायमंड्सने 21 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. पण अनिल कुंबळेने या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. आक्रमक फलंदाज एडम गिलख्रिस्टला शून्यावर बाद केलं होतं. तर सायमंड, रोहित शर्मा आणि वेणुगोपाळ राव यांची विकेट काढली होती. पण आरसीबीचा संघ 144 धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. जॅक कॅलिस, राहुल द्रविड, रॉस टेलर, मार्क बाउचर, विराट कोहली असे फलंदाज असूनही पदरी निराशा पडली.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कुंबळेच्या नावावर मोठा विक्रम

अनिल कुंबळे खेळाडू म्हणून आयपीएल किंवा वनडे वर्ल्डकप किताब जिंकण्यात अपयशी ठरला. पण आयपीएल आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 45 विकेट काढल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा फक्त 6.5 प्रति षटक होता. तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याने 18 सामन्यात 31 विकेट काढल्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 4 प्रति षटक आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने 2025 मध्ये पहिल्यांदा जेतेपद मिळवलं. यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान आहे. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. पण तिन्ही वेळेस पदरी निराश पडली होती.  2009, 2011 आणि 2016 रोजी अंतिम फेरी गाठली होती. पण या तिन्ही वेळेस अयपश आलं होतं.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!