AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs PBKS IPL 2022: 4,6,6,4 जॉनी बेयरस्टो पेटला, हेझलवुडसह सगळ्यांनाच धुतलं, Must Watch इनिंग

RCB vs PBKS IPL 2022: जॉनी बेयरस्टोने आज पहिल्या ओव्हरपासून आक्रमक पवित्रा घेतला. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने आज गोलंदाजीची सुरुवात केली.

RCB vs PBKS IPL 2022: 4,6,6,4 जॉनी बेयरस्टो पेटला, हेझलवुडसह सगळ्यांनाच धुतलं, Must Watch इनिंग
IPL 2022 PBKS Jonny Bairstow Image Credit source: instagram
| Updated on: May 13, 2022 | 9:15 PM
Share

मुंबई: ब्रेबॉर्न स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्समध्ये (RCB vs PBKS) सामना सुरु आहे. आयपीएल 2022 मधला हा 60 वा सामना आहे. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी पंजाब आणि बँगलोर दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. प्लेऑफमधील (Playoff) आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पंजाबला आज जिंकावचं लागेल. आरसीबीने हा सामना जिंकला, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग थोडा सुकर होईल. पॉइंटस टेबलमध्ये (Points Table) 7 विजयासह आरसीबीचा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर पंजाब किंग्सचा संघ 5 विजयासह 8 व्या स्थानावर आहे. दोन्ही संघांसाठी आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सकडून शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टोची जोडी मैदानात उतरली होती.

जॉनी बेयरस्टोने जोश हेझलवुडला कसं धुतलं, ते एकदा इथे क्लिक करुन बघा

नुसता फोर, सिक्सचा पाऊस

जॉनी बेयरस्टोने आज पहिल्या ओव्हरपासून आक्रमक पवित्रा घेतला. आरसीबीकडून ग्लेन मॅक्सवेलने आज गोलंदाजीची सुरुवात केली. बेयरस्टोने मॅक्सवेलच्या पाचव्या चेंडूवर सहज षटकार मारला. त्यानंतर या स्पर्धेत किफायती गोलंदाजी करणाऱ्या जोश हेझलवूडला बेयरस्टोने टार्गेट केलं. बेयरस्टोने हेझलवूडच्या ओव्हरमध्ये दोन चौकार, दोन षटकारांसह 22 धावा लुटल्या. पंजाब किंग्सने सामन्याचं महत्त्व लक्षात घेऊन दमदार फलंदाजी केली.

View this post on Instagram

A post shared by IPL (@iplt20)

आज पंजाबला जिंकावच लागेल

पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात पंजाब किंग्सने 1 बाद 83 धावा केल्या. बेयरस्टोने 21 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यात 3 चौकार आणि सात षटकार आहेत. शिखर धवनही दुसऱ्याबाजूने त्याला चांगली साथ देत होता. तो 21 धावांवर मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. जॉनी बेयरस्टो 29 चेंडूत 66 धावांवर बाद झाला. शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर त्याने मोहम्मद सिराजकडे झेल दिला. दोन्ही संघांमध्ये पहिला सामना हायस्कोरिंग झाला होता. त्यावेळी पंजाबने बँगलोरवर विजय मिळवला होता. बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात जॉनी बेयरस्टोचं तुफान आलं आहे. त्याला रोखायचं कसं? हाच आरसीबीच्या गोलंदाजांसमोर प्रश्न आहे. त्याने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पंजाबला प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आज आपल्या खेळाचा स्तर उंचावावा लागेल. कारण प्लेऑफची शर्यत खूपच रंगतदार आहे. काल एका पराभवाने चेन्नईच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.

Follow Us
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार
विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, शिरसाटांचा मोठा दावा- ठाकरेच उमेदवार.
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध
राघव चड्ढा यांच्यासारखं... पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विध.
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?
ठाकरे–फडणवीस मध्यरात्री भेट? काय झाली चर्चा? फडणवीस यांचं उत्तर काय?.
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,
मोठी बातमी! सुप्रिया सुळे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर दाखल,.
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?
7 राज्यसभा खासदारांच्या विलिनीकरणाची चर्चा, भाजपकडे झुकते पारडे?.
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर
संजय राऊतांनी बोलणं टाळलं मात्र नवनाथ बन यांनी एका ओळीतच दिलं उत्तर.
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण
अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हण.
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट
मोठी बातमी! राजकारणात मोठ्या घडामोडी? ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट.
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप
AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप.
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी
मला अटक झाली तेव्हाही... आप खासदारांच्या पक्षप्रवेशानंतर संजय राऊतांनी.