AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Who is Vaibhav Arora: IPL मध्ये दिसला भारताचा भविष्यातील स्विंगचा सुल्तान, मोईन अलीची दांडी गुल करणारा वैभव अरोरा कोण आहे?

Who is Vaibhav Arora: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आज पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) डेब्यु करणाऱ्या वैभव अरोराने लक्षवेधी कामगिरी केली.

Who is Vaibhav Arora: IPL मध्ये दिसला भारताचा भविष्यातील स्विंगचा सुल्तान, मोईन अलीची दांडी गुल करणारा वैभव अरोरा कोण आहे?
IPL 2022: पंजाब किंग्स, वैभव अरोरा Image Credit source: instagram
| Updated on: Apr 04, 2022 | 8:17 AM
Share

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) आज पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) डेब्यु करणाऱ्या वैभव अरोराने लक्षवेधी कामगिरी केली. पंजाब किंग्सचा बलाढ्य चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सामना सुरु आहे. वैभव अरोराच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे चेन्नईचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सने आज आपल्या संघात दोन बदल करत वैभव अरोर आणि जितेशला डेब्युची संधी दिली. वैभव अरोरा (Vaibhav Arora) पंजाब किंग्सचा नेट बॉलर होता. आज त्याच संघातून त्याला खेळण्याची संधी मिळाली. हे त्याच्यासाठी स्वप्न साकार होण्यासारखं आहे. 14 डिसेंबर 1997 रोजी वैभवचा जन्म झाला. वैभव अरोरा अंबालाचा आहे. क्रिकेट खेळण्यासाठी तो चंदीगडला आला. त्याने क्रिकेटसाठी हिमाचल प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला.

त्याचं जबरदस्त कमबॅक

हिमाचलच्या संघाकडून त्याने रणजी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. 2017 मध्ये त्याला एक दुखापत झाली होती. त्यामुळे वर्षभर तो क्रिकेटपासून दूर होता. पण त्याने जबरदस्त कमबॅक केलं. 2019-20 मध्ये त्याने हिमाचल प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2021 मध्ये सैयद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत तो आपला पहिला सामना खेळला. तिथे त्याच्या स्विंग गोलंदाजीमुळे अनेक फ्रेंचायजींची नजर त्याच्याकडे वळली. सहा सामन्यात 10 विकेट घेऊन त्याने आपल्या टीमला क्वार्टर फायनलपर्यंत पोहोचवले.

केकेआर आणि PBKS मध्ये चुरस

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्सने वैभवला मागच्या सीजनआधी ट्रायलसाठी बोलावलं होतं. त्यानंतर केकेआरने त्याला 20 लाख रुपयात विकत घेतलं. पण संपूर्ण सीजनमध्ये खेळण्याची संधी दिली नाही. या सीजनमध्ये वैभव अरोराला विकत घेण्यासाठी केकेआर आणि PBKS मध्ये चुरस दिसली. त्यामुळे अवघी 20 लाख बेस प्राइस असलेल्या वैभव अरोराला पंजाबने दोन कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं.

कुंबळे स्विंग यॉर्कर आणि बाऊन्सरने प्रभावित

सर्वप्रथम नेट बॉलर म्हणून तो पंजाब किंग्ससोबत यूएईमध्ये गेला होता. तिथे त्याला ख्रिस गेल, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सारख्या फलंदाजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. हेड कोच अनिल कुंबळे त्याचे स्विंग यॉर्कर आणि बाऊन्सरने प्रभावित झाले. अखेर पंजाबने आज या युवा खेळाडूला संधी दिली. त्याने सुद्धा मिळालेल्या संधीच सोन केलं. चार षटकात अवघ्या 21 धावा देत दोन विकेट घेतल्या. मोइल अली आणि रॉबिन उथाप्पा सारख्या दिग्गज पलंदाजांना त्याने आऊट केलं.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.