W IND vs W ENG 1st T20 | पहिल्याच ओव्हरमध्ये दोन बॉलमध्ये दोन विकेट, वानखेडेवर रेणूकाची दहशत, पाहा Video

Renuka Singh Two Wicket : टीम इंडियाची वेगवान गोलंदाज रेणूका सिंह ठाकूरने इंग्लंड संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठे धक्के दिले. वानखेडेवर सुरू असलेल्या सामन्यात रेणूकाने टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिली.

W IND vs W ENG 1st T20 | पहिल्याच ओव्हरमध्ये दोन बॉलमध्ये दोन विकेट, वानखेडेवर रेणूकाची दहशत, पाहा Video
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 1:08 AM

मुंबई : वूमन्स टीम इंडिया आणि वूमन्स इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात इंग्लंडचा संघ बॅटींग करत आहे. इंग्लंड संघाने टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 197-6  धावा केल्या आहेत. या सामन्यात पहिल्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाची वेगवान गोलंदाज रेणूका सिंह ठाकूर हिने सलग दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. महत्त्वाचं म्हणजे रेणूकाने इंग्लंडच्या दोन्ही खेळाडूंना बोल्ड केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ-:

पहिल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर सोफिया डंकलेला आऊट केलं. बॅटची कट घेऊन चेंडू  स्टम्प्सवर आदळला. त्यानंतरच्या पाचव्या चेंडूवर आणि  अॅलिस कॅप्सीला रेणूका इन स्विंग टाकत बोल्ड केलं. इंग्लंड संघाला पहिल्याच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के बसले होते. मात्र त्यानंतर नॅट सायव्हर-ब्रंट आणि डॅनियल व्याट यांनी डाव सांभाळला.

दोघींनी 138 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेलं. नॅट सायव्हर-ब्रंटने 53 चेंडूत 77 आणि डॅनियल व्याटने 47 बॉलमध्ये 75 धावा केल्या. त्यानंतर  एमी जोन्स हिने 9 बॉलमध्ये 23 धावा करत संघाची धावसंख्या 200 च्या आसपास पोहोचवली. रेणूकने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

वूमन्स इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | हेदर नाइट (कर्णधार), डॅनियल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल आणि माहिका गौर.

वूमन्स टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), श्रेयांका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग आणि सायका इशाक.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.