ऋषभ पंतच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा, अशी कामगिरी करणारा तिसरा विकेटकीपर

भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऋषभ पंतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आतापर्यंत भारताच्या दोन विकेटकीपरने ही कामगिरी केली आहे. त्यात आता ऋषभ पंतची भर पडली आहे.

ऋषभ पंतच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा, अशी कामगिरी करणारा तिसरा विकेटकीपर
ऋषभ पंत
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 22, 2025 | 5:37 PM

भारत इंग्लंड पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विकेटकीपर फलंदाजी ऋषभ पंतने मोठी कामगिरी केली आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाला आणि ऋषभ पंतने विकेटच्या मागे विक्रमाची नोंद केली. तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला ओली पोप 106 करत मैदानावर तग धरून होता. पण प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर चूक केली आणि थेट ऋषभ पंतच्या हातात झेल गेला. ऋषभ पंतने चूक न करता हा झेल पकडला आणि त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. यापूर्वी भारताच्या फक्त दोन विकेटकीपरला अशी कामगिरी करता आली होती. त्यात आता ऋषभ पंत तिसरा विकेटकीपर असणार आहे. कारण ओली पोपचा झेल पकडताच ऋषभ पंतचे कसोटी क्रिकेटमध्ये 150 झेल पूर्ण झाले आहेत. पंतच्या पुढे महेंद्रसिंह धोनी आणि सय्यद किरमानी आहेत. महेंद्रसिंह धोनीने कसोटीत 256 झेल, तर सय्यद किरमानीने कसोटीत 160 झेल पकडले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंतच्या नावार आता 151 झेल झाले आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतकडे सय्यद किरमानीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. यासाठी त्याला आणखी 10 झेल पकडण्याची गरज आहे. या मालिकेत अशी कामगिरी करणं सहज शक्य आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या मार्क बाउचरच्या नावावर आहे. त्याने 147 कसोटी सामन्यातील 281 डावात 532 झेल पकडले आहेत. तर 23 स्टम्पिंग केल्या आहेत. या यादीत एमएस धोनी आठव्या स्थानावर आहे. 26 व्या स्थानावर सय्यद किरमानी, तर 28व्या स्थानावर ऋषभ पंत आहे.

ऋषभ पंत जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसत आहे. आयपीएल 2025 स्पर्धेच्या साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्यानंतर आता कसोटी सामन्यात शतक ठोकलं आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म जबरदस्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कधी काळी त्याच्यावर टीका करणाऱ्या सुनील गावस्कर यांनीही त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत.