Rishabh Pant Health : ऋषभ पंतबाबत एक मोठी Good News

Rishabh Pant Health : मागच्यावर्षी 30 डिसेंबरला ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. दिल्लीहून रुडकी येथे जात असताना, त्याची कार डिवायडरला धडकून पलटी झाली होती. कारने पेट घेतला होता. पण सुदैवाने ऋषभ पंत या भीषण अपघातातून बचावला.

Rishabh Pant Health : ऋषभ पंतबाबत एक मोठी Good News
rishabh pant icc best test team
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 12:15 PM

Rishabh Pant Health Update : भारतीय क्रिकेट आणि ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंतच्या प्रकृतीत आश्चर्यकारक वेगवान प्रगती सुरु आहे. याच आठवड्यात त्याला कोकीलाबेन रुग्णालयातून त्याला डिस्चार्ज मिळू शकतो. मागच्यावर्षी 30 डिसेंबरला ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. दिल्लीहून रुडकी येथे जात असताना, त्याची कार डिवायडरला धडकून पलटी झाली होती. कारने पेट घेतला होता. पण सुदैवाने ऋषभ पंत या भीषण अपघातातून बचावला. महिनाभर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर ऋषभ आता घरी जाण्यासाठी सज्ज आहे. अपघातात ऋषभ पंतच्या गुडघ्याचे लिगामेंट फाटले होते. त्याच्या उजव्या गुडघ्याच्या लिगामेंटच ऑपरेशन झालय. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या प्रकृतीत आश्चर्यकारक वेगाने प्रगती होतेय.

बीसीसीआय पदाधिकारी काय म्हणाला?

“ऋषभच्या प्रकृतीत खूपच चांगली सुधारणा होतेय. मेडिकल टीमने ही गुड न्यूज दिलीय. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. हीच गोष्ट प्रत्येकाला ऐकायची होती. याच आठवड्यात त्याला डिस्चार्ज मिळेल” असं वरिष्ठ बीसीसीआय पदाधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्ला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पुढच्या महिन्यात पुन्हा हॉस्पिटलनमध्ये यावं लागेल

पुढच्या महिन्यात ऋषभ पंतला पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. उजव्या गुडघ्याच्या ACL वर ऑपरेशन होईल. दिल्ली-डेहराडून हायवे वर झालेल्या अपघातात उजव्या गुडघ्याच्या तिन्ही लिगामेंटला मार लागला होता. डॉ. दिनशॉ पारडीवाला आणि त्यांच्या टीमने यशस्वी शस्त्रक्रिया केली. तीन तास हे ऑपरेशन सुरु होतं. ऋषभवर आणखी एका सर्जरीची आवश्यकता आहे.

टीम डॉ. पारडीवालांच्या संपर्कात

“ही शस्त्रक्रिया कधी करायची, त्याचा निर्णय डॉक्टर घेतील. बीसीसीआयची मेडीकल टीम डॉ. पारडीवाला आणि हॉस्पिटलच्या सतत संपर्कात आहे. लवकरच आम्हाला त्याला मैदानात पहायच आहे” असं अधिकारी म्हणाला. मैदानात कधी परतणार?

ऋषभ पंत मैदानात कधी परतणार? ते त्याच्या रिहॅबवर अवलंबून आहे. दुसऱ्या सर्जरीनंतर पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी ऋषभला 4-5 महिने लागतील. त्यानंतर त्याची रिहॅब आणि ट्रेनिंग सुरु होईल. मैदानावर परतून प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी आणखी दोन महिने लागतील. म्हणजे आणखी 5 ते 7 महिने ऋषभला मैदानापासून लांब रहाव लागू शकतं. आगामी आयपीएल आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला पंतला मुकाव लागू शकतं.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.