AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS WI: वॉर्मअपच्यावेळी ऋषभ पंतच्या ‘त्या’ कृतीने रोहित शर्माही घाबरला, पहा VIDEO

मैदानावर खेळाडूंचा वॉर्मअप सुरु होता. त्यावेळी ऋषभ पंतच्या एका कृतीने रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच घाबरला.

IND VS WI: वॉर्मअपच्यावेळी ऋषभ पंतच्या 'त्या' कृतीने रोहित शर्माही घाबरला, पहा VIDEO
| Updated on: Feb 11, 2022 | 7:25 PM
Share

अहमदाबाद: ऋषभ पंत (Rishabh Pant) मैदानावर जोरदार फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. पण त्याचवेळी मैदानावर तो अशाही काही गोष्टी करतो, की पाहणाऱ्याला हसू येईल. आज वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे सामन्याआधी मैदानावर असंच दृश्य पहायला मिळालं. वेस्ट इंडिज विरुद्ध तिसरी वनडे सुरु होण्याआधी (India vs West Indies, 3rd ODI) मैदानावर खेळाडूंचा वॉर्मअप सुरु होता. त्यावेळी ऋषभ पंतच्या एका कृतीने रोहित शर्मा (Rohit Sharma) चांगलाच घाबरला. मैदानावर जे घडलं, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल होतोय. मैदानावर वॉर्मअप सुरु असताना ऋषभच्या कृतीमुळे भारतीय कर्णधारही काही क्षणासाठी दचकला. अलीकडे ऋषभ पंतवर बेजबाबदार फटके खेळल्याबद्दल बरीच टीकाही झाली आहे. पण त्याने चुकांमधून बोध घेत दमदार फलंदाजी सुद्धा केली आहे.

नेमकं काय घडलं? रोहित शर्मा मैदानात चालत होता. त्याचा चेहरा जमिनीकडे होता. तितक्यात अचानक ऋषभ पंत समोर आला व त्याने रोहितच्या पोटाच्या दिशेने आपला पाय उचलला. अचानक पंतचा पाय समोर पाहून रोहित शर्माही दचकला. आपल्याला तो लाथ मारतोय की, काय असं रोहितला वाटलं. त्यानंतर रोहित पंतला काहीतरी बोलला. पंतनेही त्यावर हसूनच रोहितला काहीतरी सांगितलं.

पंतची दमदार फलंदाजी तिसऱ्या वनडेआधी वॉर्मअप दरम्यान ऋषभ भले मस्करी करताना दिसला. पण मॅचमध्ये त्याने तितकीच गांभीर्याने फलंदाजी केली. पंतने संकटात सापडलेला भारताचा डाव सावरला. पंत आणि श्रेयस अय्यर दोघे संकटमोचक ठरले. 47 चेंडूत पंतने अर्धशतक झळकावलं. 56 धावांवर पंत आऊट झाला. चौथ्या विकेटसाठी त्याने श्रेयस अय्यर सोबत 110 धावांची भागीदारी केली.

rishabh pant rohit sharma warm up funny video india vs west indies 3rd odi

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.