मी वारंवार सांगणार नाही..! ऋषभ पंत गोलंदाजावर भडकला, रवि शास्त्रीही मधे पडले

दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिका विजय मिळवणार हे जवळपास निश्चित आहे. विजयासाठी 550 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हे आव्हान काही टीम इंडियाला गाठणं जमणार नाही. त्यात विकेटही गमावली आहे. असं असताना या सामन्यात ऋषभ पंतचा पारा चढलेला दिसला.

मी वारंवार सांगणार नाही..! ऋषभ पंत गोलंदाजावर भडकला, रवि शास्त्रीही मधे पडले
मी वारंवार सांगणार नाही..! ऋषभ पंत गोलंदाजावर भडकला, रवि शास्त्रीही मधे पडले
Image Credit source: PTI
Updated on: Nov 25, 2025 | 3:50 PM

कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे आऊट झाल्यानंतर कर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतच्या खांद्यावर आली आहे. हा कसोटी सामना हातून जाणार हे स्पष्ट झालं आहे. कारम दक्षिण अफ्रिकेने 549 धावा केल्या असून 550 धावांचं आहे. असं असताना ऋषभ पंतचा पारा दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवताना चढलेला दिसला. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी गोलंदाजांना त्याने झापलं. गोलंदाज आपल्या वेळेचं बंधन पाळत नव्हते त्यामुळे कर्णधार ऋषभ पंत संतापला होता. दक्षिण अफ्रिका दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना 48वं षटक टाकण्यासाठी कुलदीप यादव आाल होता. त्यावेळी ऋषभ पंतने त्याला खडे बोल सुनावले. त्याचं म्हणणं स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालं आहे. कुलदीप यादवने षटक सुरु करण्यास वेळ घेतल्याने ऋषभ पंतने त्याला झापलं. इतकंच काय तर गोलंदाज गोलंदाजी करतानाही वेळेची मर्यादा पाळत नव्हते.

कर्णधार ऋषभ पंतने कुलदीप यादवला सांगितलं की, ‘पहिला चेंडू टाक मित्रा. असं करू नकोस.. मी वारंवार सांगणार नाही.’ ऋषभ पंतचं असं सांगणं सहाजिकच होतं. कारण त्याला पंचांकडून आणखी एक ताकीद नको होती. पंत असा इशारा पहिल्या डावात मिळाला होता. त्यामुळे ऋषभ वारंवार चेंडू लवकर टाकण्याची विनंती करत होता. कुलदीप यादवमुळेच पहिल्या डावात पंतला दोनदा ताकीद मिळाली होती. आयसीसीच्या स्टॉप क्लॉक नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमजवळ पुढचं षटक टाकण्यासाठी 60 सेकंदाचा अवधी असतो. जर असं झालं नाही दोन वेळा ताकीद दिली जाते. त्यानंतर असं केल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा पेनल्टी म्हणून दिल्या जातात.

रवि शास्त्रींनी या वादात टाकली उडी

कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांच्यातील संभाषण जेव्हा कानावर पडलं तेव्हा रवि शास्त्री समालोचन करत होते. त्यांनी ऋषभ पंतची विनंती योग्य असल्याचं म्हंटलं. रवि शास्त्री यांनी सांगितलं की, ‘तुम्ही ऐकू शकता ऋषभ पंत मागून काय बोलत आहे. हे खूपच वाईट आहे. त्याला दोन षटकांच्या दरम्यान लागणार्‍या वेळेसाठी इशारा दिला गेला आहे. एक गोलंदाज म्हणून त्याला त्याचं क्षेत्ररक्षण माहिती असायला हवं. तुम्ही तिथे येऊन लोकांना इकडे तिकडे हलवणं सुरू करू शकत नाही. ऋषभ तेच सांगत आहे.’