रितेश देशमुख म्हणाला, टीम इंडिया ‘लय भारी’, संभाजीराजे म्हणतात ‘अमेझिंग’

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने पराभव करुन मालिका 2-1 खिशात घातली.

रितेश देशमुख म्हणाला, टीम इंडिया 'लय भारी', संभाजीराजे म्हणतात 'अमेझिंग'
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 2:05 PM

मुंबईटीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind Vs Aus) यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सने पराभव करुन मालिका 2-1 खिशात घातली. चौथी कसोटी जिंकून भारताने कांगारुंची घमेंड उतरवली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यात भारताचे 9 खेळाडू जायबंदी झाले. एकापाठोपाठ एक संकटांची मालिका टीम इंडियावर होती. परंतु टीम इंडिया या सगळ्या संकटांना पुरुन उरली. भारताने मोठ्या थाटात ब्रिस्बेन ग्राऊंडवर विजयी जल्लोष केला. भारताच्या विजयावर अनेक दिग्गज खेळाडू, मान्यवर खूश आहेत. (Riteish Deshmukh, Sambhajiraje tweet on India Create History Win gabba test)

अभिनेता रितेश देशमुख (riteish Deshmulh) याने टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. भारतीय संघाने विजय साजरा केल्याबरोबर ‘इंडिया झिंदाबाद’ अशा शब्दात त्याने टीम इंडियाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. भारतीय संघाचा अभिमान वाटतो, अप्रतिम विजय… असं म्हणत रोमहर्षक विजयाबद्दल भारतीय संघाच्या कर्णधाराचं रितेशने अभिनंदन केलं आहे.

भारताचा थरारक विजय…. ‘अमेझिंग’

भारताचा ऑस्ट्रेलियावर थरारक विजय… रिषभ पंत, शुभमन गिल, ठाकूर, पुजारा, वॉश्गिंटन सुंदर काय खेळलेत….  अमेझिंग विजय, अशा शब्दात खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

वेल डन टीम इंडिया- शरद पवार

ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या विजयासाठी भारतीय संघाचं अभिनंदन… भारतीय क्रिकेटसाठी आजचा विजय निश्चित ऐतिहासिक आहे…. ब्रिस्बेनमध्ये 32 वर्षांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला… वेल डन टीम इंडिया, असं ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केलं आहे.

ऑस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांचं आव्हान ठेवलं होते. शुभमन गिलच्या संयमी 91 आणि रिषभ पंतच्या आक्रमक 89 धावांच्या जोरावर  भारताने हे आव्हान पूर्ण केले. शुभमन गिलने पहिल्या डावात 50 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या डावात शुभमनने 91 धावा केल्या.

भारताने कांगारुंना लोळवलं तो क्षण…

कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या रिषभ पंतने आक्रमक फलंदाजी करत 138 चेंडूमध्ये 9 चौकार, एक षटकारासह भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. टीम इंडियाचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील सलग तिसरा म्हणजेच हॅटट्रिक मालिका विजय ठरला आहे. टीम इंडियाकडून शुभमन गिलने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. तर रिषभ पंतने निर्णायक क्षणी फटकेबाजी करत म्हत्वाची भूमिका बजावली. पंतने निर्णायक 89 धावांची नाबाद खेळी केली.

(Riteish Deshmukh, Sambhajiraje tweet on India Create History Win gabba test)

हे ही वाचा

Aus vs Ind 4th Test | संयमी गिलने पाया रचला, धडाकेबाज रिषभ पंतने कळस चढवला

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.