AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नाही तर या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री, Video झाला व्हायरल

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका नुकतीच संपली असून सर्वांना आयपीएलचे वेध लागले आहेत. पण कर्णधार रोहित शर्माच्या मनात काही वेगळंच सुरु असल्याचं दिसून आलं. एकीकडे मुंबई इंडियन्सचे खेळाडू नारळ फोडून कामाला लागलेत. पण रोहित शर्मा दुसऱ्याच ड्रेसिंग रुममध्ये दिसला.

रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नाही तर या संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये एन्ट्री, Video झाला व्हायरल
| Updated on: Mar 12, 2024 | 8:13 PM
Share

मुंबई : आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सविरुद्ध 24 मार्चला होणार आहे. आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स शुभारंभाचा नारळ फोडला असून सराव सुरु केला आहे. यावेळी मुंबई इंडियन्स संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बराच बदल पाहायला मिळणार आहे. रोहित शर्माऐवजी हार्दिक पांड्या नेतृत्व सांभाळताना दिसणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी राहील याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा जेतेपद मिळवून देणार का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशी सर्व तयारी सुरु असताना रोहित शर्मा अजून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात रुजू झालेला नाही. या दरम्यान रोहित शर्मा वेगळ्याच ड्रेसिंग रुममध्ये दिसला. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघासोबत कधी येईल याबाबतही कोणालाच पत्ता नाही. या दरम्यान रोहित शर्मा रणजी ट्रॉफी अंतिम फेरीत दिसला.

मुंबई आणि विदर्भ यांच्या रणजी स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माने हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी सोबत बसलेला दिला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जात आहे. मुंबईच्या ड्रेसिंग रुममधला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्माने नुकतंच देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. तसेच जेव्हा संधी मिळेल तेव्हा देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. आता स्वत:च मुंबई संघाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये गेल्याने चाहते खूश झाले होते. पाचव्या कसोटी सामन्यामुळे रोहित शर्मा रणजीच्या अंतिम फेरीत खेळू शकला नाही. पण ड्रेसिंग रुममध्ये जाऊन संघाला पाठिंबा दर्शवला.

रोहित शर्माने 2013 ते 2023 या कालावधीत मुंबई इंडियन्स नेतृत्व केलं. या दहा वर्षाच्या कालावधीत त्याने मुंबई इंडियन्सला पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली आयपीएल चषकावर नाव कोरलं. रोहित शर्माने आयपीएलमध्ये एकूण 243 सामने खेळले असून 29.58 च्या सरासरीनने 6211 धावा केल्या आहेत. यात 42 अर्धशतक आणि एका शतकाचा समावेश आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.