AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ | “फार पुढचा…” कॅप्टन रोहित शर्मा विजयानंतर असं का म्हणाला?

Rohit Sharma Reaction After Win Against New Zealand | टीम इंडियाने न्यूझीलंडची हेकडी मोडत 20 वर्षांचा सर्व हिशोब एकदाच पूर्ण केला. टीम इंडियाच्या विजयानंतर कॅप्टन काय म्हणाला?

IND vs NZ | फार पुढचा... कॅप्टन रोहित शर्मा विजयानंतर असं का म्हणाला?
| Updated on: Oct 23, 2023 | 12:58 AM
Share

धर्मशाळा | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया सरस ठरली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत सलग पाचवा विजय साकारला आहे. तसेच कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड कपमध्ये 20 वर्षांनी विजय मिळवला. किवींनी विजयासाठी दिलेलं 274 धावांचं आव्हान हे भारतीय संघाने विराट कोहली याच्या 95 धावांच्या जोरावर 12 बॉल ठेवून आणि 4 विकेट्स राखून पूर्ण केलं.

विराट कोहलीसह कॅप्टन रोहित शर्मा (46), रविंद्र जडेजा (39*), श्रेयस अय्यर (33), केएल राहुल (27) आणि शुबमन गिल याने (26) धावांचं योगदान दिलं. तर त्याआधी टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडला धोबीपछाड देत अव्वल स्थानी कब्जा केला आहे. तर न्यूझीलंडची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. न्यूझीलंवर तब्बल 20 वर्षांनी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियात, क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा काय म्हणाला, तसेच त्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमीबाबत काय म्हटलं हे आपण जाणून घेऊयात.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“स्पर्धेची चांगली सुरुवात झाली आहे. मात्र मोहिम अजून बाकी आहे. संतुलित राहणे महत्वाचं आहे. फार पुढचा विचार करायचा नाही. वर्तमानात राहणं महत्वाचंय”, असं रोहितने म्हटलं. तसेच रोहितने शमीचं तोंडभरुन कौतुक केल.

“मोहम्मद शमी याने मिळालेल्या संधीचा दोन्ही हातांनी फायदा घेतला. शमीला परिस्थितीचा अनुभव आहे. तो उत्तम बॉलर आहे. न्यूझीलंड 300 धावा करेल असं एकवेळ वाटत होतं. मात्र न्यूझीलंडला गुंडाळलं याचं श्रेय आमच्या गोलंदाजांचं आहे” असं म्हणत रोहितने गोलंदाजांना क्रेडीट दिलं.

रोहित विराटबाबत काय म्हणाला?

“आम्ही जिंकलो याचा आनंद आहे. फार काय बोलायचं नाहीये. त्या विराटने आमच्यासाठी निर्णायक क्षणी अशी अनेकदा कामगिरी केली आहे”, असं रोहित म्हणाला. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना टीम इंडियाच्या सलामी जोडीने 71 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने विकेट्स टाकल्यानंतर विराट कोहली याने एक बाजू लावून धरली. त्यामुळे टीम इंडियाचा मार्ग एकदम मोकळा झाला.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.